petrol prices; Fuel price hike to Mission Begin Again akola marathi news  
महाराष्ट्र बातम्या

तीन महिन्यांपासून गाडी घरातच होती...बाहेर काढली अन् वाढले पेट्रोलचे दर; मिशन बिगिन अगेनला इंधन दरवाढीची सलामी

विवेक मेतकर

अकोलाः शहरात जवळपास तीन महिन्यांपासून लॉकडाउन सूरू होते. आता मिशन बिगिन अगेन सूरू झाले. मात्र, तीन महिन्यांपासून दारात उभी असलेली गाडी आज घराबाहेर काढली अन् चक्क 1.15 रुपयांनी पेट्रोलचे भाव वाढलेले आढळले. कामावर जायचेय, बाजारात जायचेय मात्र, प्रतिलिटर 1.15 रुपये अधिकचा भूर्दंड आज ग्राहकांना बसला. 

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. अकोल्यात आज पेट्रोल 58 पैशांनी महागलं. यामुळे शहरात एक लिटर पेट्रोलचा दर 79 रुपये 62 पैसे इतका झाला आहे. खरं तर हा जुन महिन्यातला उच्चांकी दर म्हणता येईल. तर डिझेलच्या दरातही 55 पैशांची वाढ झाली आहे. यामुळे प्रति एक लिटर डिझेलची किंमत 68 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. गेल्या 80 दिवसानंतर काल पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यानंतर काल रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 57 पैशांची वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल 55 पैशांनी महाग झाले आहे.

दरम्यान, मिशन बिगिनचा तिसरा टप्पा आजपासून (ता.०8) सुरु झाला आहे. पुनश्च ‘हरीओम’ या अभियानांतर्गत राज्य सरकारने शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार आजपासून तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये खासगी कार्यालये तसेच सार्वजनिक दळणवळण सेवा सुरू होणार आहे. सर्व दुकाने,  मार्केटस् ठराविक वेळेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यासोबतच सार्वजनिक दळणवळण सेवा सुरू होणार आहे.


1 जूनपासून राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ला सुरुवात झाली. तर शनिवारपासून राज्यभरात या मिशनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. राज्य सरकारनं शुक्रवारपासून काही अटींवर दुकानं सुरू करण्याची परवानगी सुध्दा दिली आहे.

त्यातच अशी महागाई सामान्य माणसाला अजिबात परवडणारी नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक जणांचे खाण्याचेही वांदे झालेत. मात्र आता पेट्रोल दरवाढीने आणखीनच धडकी भरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT