Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput Google
मनोरंजन

सुशांत सिंग राजपुतबाबत आज त्याच्या वाढदिवशी मोठा खुलासा समोर...

प्रणाली मोरे

सुशांत सिंग राजपूतनं(Sushant Singh Rajput) खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमावलं होतं. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास बॉलीवूडच्या सुपरहिट छिछोरे सिनेमापर्यंत येऊ अचानक थांबला. ज्यादिवशी अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली गेली. करिअर इतकं चांगलं चाललेलं असताना नेमकं काय घडलं त्याच्या आयुष्यात की त्याला आत्महत्या कराविशी वाटली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधल्या नेपोटिझमचा तो बळी ठरला या मुद्दयावरून मोठं नाट्य घडलेलं आपण सर्वांनीच पाहिलं. पुढे सी.बी.आय,एन.सी.बी चौकशीत तर तो ड्रग्ज सेवनाचा बळी ठरला हे वेगळंच कारण समोर आलं. अजुनही त्याच्या आत्महत्येवरून चाललेला तपास हा सुरूच आहे.

आज २१ जानेवारी,सुशांत सिंग राजपूतचा ३६ वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची शेवटची इच्छा काय होती याविषयी एक नवीन बातमी समोर आली आहे. सुशांतच्या 'सोनचिडियॉं' या सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक चौबेनं याविषयी खुलासा केला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या एका फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. सुशांत बांद्रा येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्या फ्लॅटचं भाड केवळ महिन्याला चार ते पाच लाख इतकं होतं. त्यानं त्या घराला खुप मनापासून सजवलेलं होतं. त्या घरात त्याच्या घराच्या बालकणीला लागून हॉलमध्ये कोपऱ्यात असलेल्या टेलिस्कोपने सगळ्यांचं लक्ष वेधलं. सुशांत हा अभिनेता,काही वैज्ञानिक नाही तर त्याच्या घरात इतका प्रोफेशनल टेलिस्कोप कशासाठी? त्यानंतर सगळं सत्य समोर आलं. सुशांतहा विज्ञानप्रेमी होता. मुळात तो इंजिनिअर होता. त्यानं डिग्री हातात घेतली नव्हती तरी त्यानं काही वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. त्याला सिनेमातनं काम करून खूप पैसा कमवायचा होता तो फक्त आपला एक सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी. त्यानं आपला संपूर्ण पैसा हा त्या प्रोजेक्टवरच खर्च केला होता. सुशांतची ही ईच्छा होती आणि तिला पू्र्ण करण्यासाठी त्याला आपल्या पैशाचीही चिंता नव्हती. तो काही करायला तयार होता. पण त्याच्या अचानक जाण्याने ती अपूरी राहिल्याचं अभिषेक चौबेनं नमूंद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

Fact Check: बांगलादेशी धर्मगुरूचे जुने द्वेषपूर्ण भाषण भारतीय निवडणुकांशी संबंध जोडत होतेय व्हायरल

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

SCROLL FOR NEXT