amitabh
amitabh 
मनोरंजन

...त्यांच्या धैर्याला सलाम म्हणत हेड कॉन्स्टेबलला बिग बींसह अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी तसेच सफाई कामगार काम करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस सतत कोरोना रुग्णांच्या संपर्कात असतात. तर पोलिस कर्मचारी जनतेच्या सुरक्षिततेसाठी तासन् तास काम करत आहेत. आपल्या या लढवय्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. मात्र जनतेची सेवा करत असताना यातीलच काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यातील काहींनी कोरोनावर मात मिळवली. मात्र आज कोरोनामुळे पोलिस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यु झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या हेड कॉन्स्टेबलच्या मृत्युनंतर सोशल मीडियाद्वारे कलाकारांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. 

वाकोला पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंदूरकर यांचा कोरोना विषाणूमुळे आज मृत्यु झाला. ते 57 वर्षांचे होते. अशी माहिती मुंबई पोलिस या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली. त्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत या हेड कॉन्स्टेबलला श्रद्धांजली वाहिली. `ही खरंच दुखःद बातमी आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता ते आपल्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम.` असे ट्विट अमिताभ यांनी केले आहे.

तसेच `आज मुंबईकरांनी खरा हिरो गमावला` असे ट्विट करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या हेड कॉन्स्टेबलला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता रितेश देशमुखनेही चंद्रकांत पेंदुरकर तुम्ही खरे हिरो आहात. तुमच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत असे म्हणत त्याने दुःख व्यक्त केलं. 

या साऱ्या कलाकारांबरोबरच अनुभव सिन्हा, शंकर महादेवन, मधुर भंडारकर, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांसारख्या अनेक मंडळींनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

चंद्रकांत पेंदूरकर या हेड कॉन्स्टेबलच्या मृत्युची बातमी खरंच मन हेलावणारी आहे. आज असे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहत देशाची सेवा करत आहेत. त्यांच करावं तेवढं कौतुक कमी आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT