sakal
मनोरंजन

पिच्चर सोनालीचा अन ट्रेनिंग दाजींना, नवऱ्यासोबतचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हयरल

सोनाली कुलकर्णी हिच्या 'तमाशा live' या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यानचा एक विडिओ समोर आला आहे.

नीलेश अडसूळ

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या 'तमाशा लाईव्ह'या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. माध्यम जगतातील आराजकतेवर भाष्य करणारा हा चित्रपट वेगळा विषय घेऊन आला आहे. तसेच हा म्युझिकल सिनेमा असून त्यातील सोनालीचे (sonalee kulkarni) 'रंग लागला' हे गाणे भलतेच गाजत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रीमिअर शो चे आयोजन करण्यात आले होते. या प्रीमिअरला सोनाली कुलकर्णीचा नवरा कुणाल बेनोडकरनेही हजेरी लावली होती. या दरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सोनाली आपल्या नवऱ्याला ट्रेनिंग देत आहे.

(sonalee kulkarni giving training to her husband kunal benodekar on how to pose in front of paparazzi)

तमाशा लाईव्ह या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सोनालीचा नवरा कुणाल बेनोडकरही उपस्थित होता. सोनाली आणि कुणालने एकत्र फोटोही काढले. यावेळी पापराझींना फोटो काढण्यासाठी पोझ देतानाचा दोघांचा एक व्हिडीओे समोर आला आहे. या व्हिडीओत सोनाली ही कुणालला पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची, कॅमेऱ्याकडे कसे पाहायचे, याबाबत ट्रेनिंग देत आहे.

या दोघांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एका माध्यमाने हा व्हिडिओ शेयर केला असून चाहत्यांनीत्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. दोघांच्या जोडीवर चाहत्यांनी प्रेम दर्शवले आहेच पण 'दाजींना सोनाली ट्रेनिंग देत आहे'अशा गामितीशीर प्रतिक्रियाही आल्या आहेत. सोनाली आणि कुणाल बरेच चर्चेत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या सेकंड हनिमूनचे फोटोही व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : हवामान विभागाचा अंदाज आला, पाऊस वाढणार; मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट

ENG vs IND: बेन स्टोक्स १०० षटकं फेकतोय अन् आपल्या हिरोंचा वर्क लोडवरून ठणाणा! पाहा कोणी किती षटकं केलीय गोलंदाजी

Maharashtra rain forecast: उन्हाचा कडाका बस्स..! , राज्यभरात आता विजांसह पावसाचा इशारा

Pali News : भरवस्तीत आले दुर्मिळ खवले मांजर; तरुणांनी रक्षण करत वनविभागाकडे केले सुपूर्द

SCROLL FOR NEXT