ऋतुप्राप्तीचे google
मराठवाडा

किशोरवयीन मुलींनी जीवनशैली बदलावी : डॉ. आशा चांडक

अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय आदी विषयी मार्गदर्शन केले

सकाळ वृत्तसेवा

परभणी : ‘‘सध्या बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव यामुळे पहिली पाळी येण्याचे अर्थात ऋतुप्राप्तीचे वय खालावले आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींनी माहिती घेऊन आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून काळजी घ्यावी’’, असे आवाहन मासिक पाळी समुपदेशन तज्ज्ञ डॉ. आशा चांडक यांनी केले.

पेडगाव येथील सुरेश देशमुख मित्र मंडळ संचलित सिटी माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (ता. २२) होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च ॲन्ड चॅरिटीजच्या वतीने ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. चांडक बोलत होत्या. डॉ. चांडक यांनी किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड, सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय आदी विषयी मार्गदर्शन केले

या समुपदेशन सत्रात २०० विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थेचे मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकांचे वाटप केले. शेवटी तितक्याच मुलींची २० प्रश्नांची स्वयंअध्ययन चाचणी घेण्यात आली. मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बूकचे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले.

‘कप’चे मोफत वाटप करणार

येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थेतर्फे पॅडऐवजी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत कपचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक म्हणाले. या कार्यशाळेस मुख्याध्यापक एस. आर. कदम, एन. जी. संघई, सी. एन. कदम, एस. आर. आरसले, एम. एन. वाघमारे, डी. जी. भिसे, एस. एस. पैठणे, पी. टी. शिंगाडे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT