File Photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत पोलिस निरीक्षकासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबाद शहर पोलिस दलातील एका पोलिस निरीक्षकांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलिस निरिक्षकासह एकुण चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या टास्क फोर्सच्या प्रमुख अपर्णा थेटे यांनी दिली. 

गुरुवारी (ता. सात) सकाळी त्यांच्या चाचणीच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मुलाला बुधवारी (ता. सहा) लागण झाल्याचा अहवाल आला होता.

यामुळे पोलिस निरीक्षक राहत असलेल्या इमारतीसह परिसर सील केला असुन स्वॅब घेण्याची प्रक्रीया सुरु आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाचा शहरातील विविध भाग हॉटस्पॉट झाले असतानाच आता रेल्वे स्थानक परिसरातही पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता 
चिंता वाढत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिस निरीक्षकांच्या मुलाला दोन दिवसांपुर्वी ताप आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचे स्वॅब घेण्यात आले. चाचणी अहवालातून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर पोलिस निरिक्षकही स्वत:हुन एका खासगी रुग्णालयात भरती झाले. रेल्वे स्थानक भागातील हमालवाडामधील एक इमारत व बाजुचा परिसर पोलिसांनी सील केला असे एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


औरंगाबादकरांसाठी चिंता वाढवणारे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता.६) ३५ जणांनंतर गुरुवारी (ता. ७) सकाळच्या सत्रात १७ जणांना कोविड विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ३७३ वर पोचली आहे. 

कोरोना मीटर 

  • उपचार घेत असलेले रुग्ण  ः ३३२
  • बरे झालेले रुग्ण               ः २९
  • मृत्यू झालेले रुग्ण            ः १२
  •  एकूण                           ः ३७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT