डॉ. गिरधर करजगावकर 
छत्रपती संभाजीनगर

Corona Virus : श्‍वासावर नियंत्रण मिळवा अन् आजारांना दूर ठेवा 

मधुकर कांबळे

औरंगाबाद - सकाळी ४५ मिनिटे आणि सायंकाळी ४५ मिनिटे प्राणायाम करून श्‍वासावर नियंत्रण मिळवल्यास रोगप्रतिकारशक्ती अतिशय चांगली होते. साधे साधे आजार तर दूर होतातच; शिवाय कोरोनाचा व्हायरस, बॅक्टेरियाचा त्रास होणार नाही, यासाठी आपल्या श्‍वासाचा उपयोग करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला डॉ. गिरधर करजगावकर यांनी दिला. 

एमबीबीएस, एमएस असलेले डॉ. करजगावकर यांनी ‘प्राणायाम, ध्यान व आहाराचा मनोकायिक आजारांवरील परिणाम’ या विषयात पीएच.डी. केली आहे. शिवाय ‘प्राणायाम : ज्ञान व विज्ञान’ या पुस्तकाचे लेखक असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना प्राणायामाचे प्रशिक्षण दिले आहे. ते म्हणाले, की शरीरातील वेगवेगळी कार्ये करण्यासाठी लागणाऱ्या प्राणशक्तींचा विस्तार, त्यांना आयाम देणे म्हणजे प्राणायाम.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आपल्या शरीराला आवश्‍यक असलेली ऊर्जा अनावश्‍यक ठिकाणी खर्च करतो. पर्यायाने ज्या अवयवांना जी ऊर्जा लागते ती मिळत नाही. यामुळे ही अतिरिक्त ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्राणायाम करणे फार महत्त्वाचे आहे. शरीरात ऑक्सिजन कन्झम्शन कॅपिसिटी वाढण्यासाठी वज्रासन खूप चांगले आहे. कुंभक, आंतर कुंभक, रेचक आणि बाह्य कुंभक असे चार टप्प्यांचे प्राणायामाचे एक चक्र पूर्ण होते. प्राणायामाचे शास्त्रात २८ प्रकार दिलेले आहेत. 

डॉ. करजगावकर म्हणाले, की श्‍वास घेतो त्यावेळी श्‍वासाचा पडदा खाली आलेला असतो आणि सोडतो तेव्हा श्‍वासाचा पडदा वर जातो व जेव्हा श्‍वास रोखून ठेवतो तेव्हा त्या पडद्याला आराम मिळतो. मग नियम आहे की, कोणत्याही गोष्टीला आराम मिळाला तर पहिल्यापेक्षा अधिक कार्यक्षमपणे काम होते. मेंदूत सतत विचारचक्र सुरू असते. मेंदूला विचार करायला थांबवणे गोळ्या-औषधाने होत नाही तर श्‍वास रोखून ठेवल्यानंतर मेंदूला विचार करण्यापासून विश्रांती मिळते. मानसिक ताणतणाव येतो, त्यावेळी माणसात डिप्रेसिव्ह एन्झाईम्स तयार होतात आणि हे रोगप्रतिकारशक्ती कमी करतात. प्राणायामाने हे डिप्रेसिव्ह एन्झाईम्स कमी कमी होत जातात व मेंदूला कार्यक्षम करण्यासाठी आवश्‍यक असलेले संप्रेरक तयार होण्याला मदत होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आहारामध्ये फळे, अद्रक, रताळी, व्हिटॅमिन ‘सी’साठी रसाळ फळांचा आहारात समावेश करा. प्राणायामाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोरोनाच काय, कोणत्याही आजाराचा त्रास होणार नाही, असा दावा त्यांनी केला. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष फोडण्याची पुनरावृत्ती झाली तर महाराष्ट्रात राडा होणार; राजीनामा द्या, नाहीतर... ठाकरे गटाचा पत्रकार परिषदेत गंभीर इशारा

Barrier-Free Toll System : टोलनाक्यांजवळील स्थानिक रहिवाशांना दिलासा ! वारंवार टोल भरण्याचा त्रास संपला; सरकार आणतेय स्मार्ट उपाय

Konkan Tourism : आता अथांग समुद्रातून होणार थेट 'कोकण देवदर्शन', 20 ते 50 जणांची क्षमता असणाऱ्या स्पीड बोट्स धावणार; गणपतीपुळे, कुणकेश्वरचा समावेश

Cricket Matches: १६ तास सलग क्रिकेट.... टीम इंडियाच्याच तीन मॅच; जाणून घ्या आजच्या ७ हायव्हाल्टेज सामन्यांचे वेळापत्रक...

पाणी जपून वापरा! विदर्भावर जलसंकटाचं सावट, ११ पैकी ८ जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT