छत्रपती संभाजीनगर - बुद्धिबळ ती लीलया खेळते. राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने अनेक नामांकित खेळाडूंना मात दिलेली आहे. आता बारावी परीक्षेच्या ‘बुद्धिबळाचा डाव’ही तिने जिद्दीने जिंकलाय! तिने राज्यातून वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. ही बुद्धिबळ खेळाडू आहे तनिषा रेणुका सागर बोरामणीकर.
देवगिरी महाविद्यालयातील तनिषाला बारावीत शंभर टक्के गुण मिळाले. असे यश मिळविणारी तनिषा ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. तिला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ तर क्रीडा गुणात १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. आपल्या यशाबद्दल आणि आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ती ‘सकाळ’शी बोलताना म्हणाली, ‘‘बारावी परीक्षेत मला ९५ टक्के मिळतील, अशी अपेक्षा होती.
परंतु, शंभर टक्के मिळाल्याने खूप आनंद होत आहे. मी वर्षभर अकाउंट या विषयाचा अभ्यास केला. या विषयावर मी जास्त भर दिला. शेवटच्या दोन महिन्यांत इतर विषयांकडे वळले. मी बुद्धिबळाच्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत असल्यामुळे महाविद्यालयाला जास्त दिवस जाता आले नाही. पण, मला महाविद्यालयातील शिक्षकांनी खूप पाठिंबा दिाला, त्यामुळेच हे यश मिळाले आहे.’’
आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा
तनिषाची आई रेणुका देशपांडे या सीए तर वडील आर्किटेक्ट आहेत. त्यामुळे घरातच शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण आहे. आई सीए असल्यामुळे अभ्यासात तिची खूप मदत झाली. वडिलांनीही खेळ असो, वा अभ्यास सतत पाठिंबा दिल्याचे तनिषाने सांगितले. अभ्यासाचा आनंद घेतला, तर यश मिळतेच. अभ्यासाचे दडपण घेतले, तर मनावर ताण येतो, असेही तनिषाने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.