औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 51 मते पडली. त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवाराला 32 मते मिळाली. निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची मते फुटली.
शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले. त्यासाठी मंगळवारी (ता.31) निवडणूक झाली. महाविकास आघाडीत उपमहापौरपद कॉंग्रेसला जाणार का? अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेने श्री. जंजाळ यांना उमेदवारी दिली.
हेही वाचा : मोदी म्हणजे हिटलरचाच पुनर्जन्म - जितेंद्र आव्हाड
मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, कॉंग्रेसकडून अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून शेख जफर असे उमेदवार होते. यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जंजाळ यांना मतदान केले. जंजाळ यांना 51 मते पडली. भाजप पुरस्कृत मलके यांना 34 तर एमआयएमचे जफर यांना 13 मते मिळाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते फुटल्याची चर्चा आहे.
अफसर खान यांचा राजीनामा
उपमहापौर निवडणुकीत तटस्थ असलेले कॉंग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. राज्यात महा आघाडीचे सरकार असताना शिवसेनेने कॉंग्रेसला संधी देणे गरजेचे होते; मात्र ही संधी नाकारण्यात आल्यामुळे राजीनामा देत असल्याचे अफसर खान यांनी सांगितले.
एमआयएमची तीन मते फुटले
एमआयएम पक्षाचे तीन मध्ये फुटले असून यातील दोन मते शिवसेनेला तर एक मत भाजप पुरस्कृत उमेदवारला पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.