crime news case against relatives of patient Private hospital vandalized in Kalyan mumbai  sakal
मुंबई

Crime News : रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल ; कल्याणमध्ये खासगी रुग्णालयाची तोडफोड

कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात रुग्ण महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात रुग्ण महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी डॉ. सुनिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन मयत रुग्णाच्या नातेवाईकांवर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मयतचे वडील मारुती झाकणे, भाऊ श्रीराम झाकणे, प्रभू झाकणे, मामा अशोक शिंदे, बहिण देवाबाई शिंदे, मावशी फुलाबाई, आई कलाबाई झाकणे यांचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेत राहणारी गंगा शिंदे हिने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारासाठी तिला बिर्ला कॉलेज रोड परिसरातील साई संजीवनी रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले होते.

उपचारा दरम्यान सोमवारी दुपारी गंगा हिचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यु झाल्याने संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी डॉक्टर सुनिल चव्हाण व त्यांच्या स्टाफला हाताच्या ठोशा बुक्क्यांनी व लाथा मारत मारहाण केली. तसेच रुग्णालयाची तोडफोड केली. याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर डॉक्टर सुनील यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत महिला गंगा हिचे आई वडिल, बहिण भाावांसह मामा, मावशी यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून मृत महिलेच्या अंतिम संस्कारानंतर याची कारवाई करण्यात येईल. सध्य परिस्थितीत पोलिसांनी संबंधित आरोपींना नोटासा बजाविण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mexico Blast: भीषण! सुपरमार्केटमध्ये भयंकर स्फोट; २३ जणांचा मृत्यू, ४ चिमुकल्यांचाही समावेश, १२ जण जखमी

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! लाखो रुपयांचा पगार मिळणार; 'असा' करा अर्ज

VIDEO : मुद्दे मी देतो, तुम्ही आंदोलन करून दाखवा! 'मॅनेज झाले' म्हणणाऱ्यांना बच्चू कडूंनी चांगलंच झापलं, नेमकं काय दिलं उत्तर? वाचा...

World Cup 2025 Final: पाऊस असाच सुरू राहिला तर २०-२० षटकांची होईल फायनल! जाणून घ्या कधी व किती वाजता लागू होईल हा नियम...

Jalgaon Cooperative Bank : सहकारी बँकांमध्ये 'मर्जीतील' भरतीला ब्रेक! खडसेंच्या तक्रारीनंतर शासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT