मुंबई

नेरळकरांच्या दरवाजावर कोरोनाची थाप 

सकाळ वृत्तसेवा

नेरळ  : कर्जत तालुक्‍यातील नेरळ गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील एका डॉक्‍टराच्या भावाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या घटनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करण्यात आले आहे. सर्व प्रकारची लसीकरण बंद करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरचा भाऊ हा मुंबई महापालिकेत काम करतो. त्यांना 17 एप्रिलला होम क्वारंटाईन करून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल 18 एप्रिलला आला. याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार कर्जत तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या डॉक्‍टरला क्वारंटाईन करण्याची सूचना केली होती. तसेच कोरोना चाचणी करण्यास कळवले होते. 

हे वाचा : या मालाचं करायचं काय?

कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या भावाची भेट घेतल्यानंतर डॉक्‍टर क्वारंटाईन झाले नव्हते. 15 एप्रिलला ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. त्यानंतर तीन दिवसांत त्यांनी असंख्य रुग्ण तपासले. आरोग्य केंद्रातील कर्मचारीही त्यांच्या संपर्कात आले आहेत. प्रशासनाने दक्षता घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात निर्जंतुकीकरण केले आहे. रुग्णालय तात्पुरते बंद केले आहे. 

प्रशासनाकडून गाव सील; चार दिवस व्यवहार बंद 
  गावातील एका तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गावाची बाजारपेठ चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्याच्या कुटुंबीयांना खारघर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. 35 हजार लोकसंख्या असलेला हा गाव सील करण्यात आला आहे. 

कोरोना झालेला तरुण नेरळ येथून दिघा एमआयडीसीमधील औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत काम करत होता. तो दररोज नेरळ येथून दुचाकीवरून दिघा येथे जात असे. त्याच्या सहकाऱ्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची तपासणी केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी कर्जतचे प्रांत अधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली. तरुणाचे वास्तव्य असलेल्या इमारतीचा परिसरात सील करण्यात आला आहे. गाव सील करण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबातील चौघांना खारघर येथील ग्रामविकास भवन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची उद्या कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT