narendra modi rahul gandhi esakal
मुंबई

Pune Accident : पुण्यातील अपघातावरून काँग्रेस आक्रमक; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

पुणे येथील या अपघातावरून राहुल गांधी यांनी ‘एक्स’ वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका अल्पवयीन बिल्डरपुत्राने भरधाव मोटार चालवीत दोघांना चिरडल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप समाजाच्या सर्वच स्तरातून होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या प्रकरणाला जबाबदार धरले असून वाहन कायद्यात एकाच गुन्ह्याला दोन प्रकारच्या शिक्षेवरून मोदी यांना एकाच देशात दोन देश निर्माण करायचे आहेत, असा आरोप केला आहे.

पुणे येथील या अपघातावरून राहुल गांधी यांनी ‘एक्स’ वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रक चालक किंवा अन्य व्यावसायिक वाहनाच्या चालकांकडून अशा प्रकारचा अपराध घडल्यास १० वर्षे शिक्षेची तरतूद, तर धनदांडग्यांच्या खासगी वाहनाने अपघात झाल्यास मात्र किरकोळ शिक्षेची तरतूद, हा प्रकार म्हणजे एकाच देशात नागरिकांना दोन प्रकारची वागणूक. हा देशातच दुही करण्याचा प्रकार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

या अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन आरोपी मद्य पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.

दारूच्या नशेत बेदरकारपणे मोटार चालवून दोघांना चिरडलेल्या आरोपीची पोलीसांनी बडदास्त ठेवून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. किरकोळ कलमे लावून लगेच कोर्टात हजर केले, पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

‘आरोपीला निर्दोष दाखविण्यासाठी तपास’

अल्पवयीन आरोपीला मद्य कसे उपलब्ध झाले, नोंदणी नसलेली मोटार पुण्यातील रस्त्यावर कशी आली, नियम डावलून बार आणि पब सुरू होते का, त्यांच्यावर कारवाई का नाही, आदी सवालांची सरबत्ती विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT