मुंबई

‘रिव्‍हाईव्‍ह सीआरपी’चे आज उद्‌घाटन

CD

‘रिव्‍हाईव्‍ह सीआरपी’चे आज उद्‌घाटन

हृदयविकाराची माहिती देणारे पहिले भारतीय बनावटीचे ॲप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : हृदयविकार आणि त्याच्याशी संबंधित विविध आजारांमुळे जगभरातील अनेक लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे आणि त्यासंबंधीची माहिती कोट्यवधी लोकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी पहिल्या भारतीय बनावटीच्या ‘रिव्हाईव्ह सीआरपी ॲप’चे आज वांद्रे पूर्वेतील जिओ वर्ल्ड कन्व्‍हेन्शन सेंटरमध्ये उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

रिव्हाईव्ह हार्ट फाउंडेशनचे संस्थापक टीम सदस्य डॉ. यश लोखंडवाला, डॉ. ब्रायन पिंटो, डॉ. आदित्य कपूर, डॉ. मंजू सिन्हा आणि डॉ. किंजल गोयल यांच्या नेतृत्वाखाली भारतातील आघाडीच्या हृदयरोगतज्ज्ञांसोबत भागीदारीत रिव्‍हाईव्ह सीपीआर ॲप विकसित करण्यात आले आहे. या चळवळीला ‘इप्का लॅबोरेटरी’ने पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही रिव्हाईव्ह सीपीआर मूव्हमेंट २०२४साठी ब्रँड ॲम्बेसेडर आहे. या हृदयविकारासंबंधी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणाऱ्या चळवळीला विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये अभिनेते अजय देवगण, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेते विवेक ओबेरॉय यांच्यासह क्रिकेटपटू इरफान पठाण आदींचा समावेश आहे. रिव्‍हाईव्‍ह सीपीआर ॲपद्वारे हृदयरोगतज्ज्ञांकडून वेळेवर सीपीआर मिळाल्यास जीव कसा वाचू शकतो, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच, हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक ॲरेस्ट यांच्यातील फरक स्पष्‍ट करताना ते कसे ओळखावेत, याबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल्सद्वारे माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळे कार्डियाक ॲरेस्टच्या परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT