मुंबई

स्तन कर्करुग्णांसाठी ‘कार्बोप्लाटिन’ आशादायी

CD

स्तन कर्करुग्णांसाठी ‘कार्बोप्लाटिन’ आशादायी

टाटा रुग्णालयाचे नवीन संशोधन; तिसऱ्या टप्प्यातील रुग्णांसाठी उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ :  टाटा मेमोरियल सेंटरमधील संशोधकांना कर्करोगाविरुद्धच्या लढाईत मोठे यश आले आहे. ‘कार्बोप्लाटिन’ या केमोथेरपी औषधामुळे स्तन कर्करुग्णांना माेठा दिलासा मिळाला असून, तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाच्या महिलांचा जीव वाचवता येणार आहे. या उपचारपद्धतीमुळे रुग्णाची जिवंत राहण्याची शक्यता ११ टक्क्यांनी, तर राेगमुक्तीचा दर १२ टक्क्यांनी वाढल्याचा दावा संशाेधकांनी केला आहे. हे स्वदेशी संशोधन जागतिक वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरल्याचे मानले जात आहे.


टाटा मेमोरियलने संशाेधनाविषयी तथ्ये मांडली आहेत. त्यानुसार प्रत्येक १०० रुग्णांपैकी सात अतिरिक्त रुग्ण महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. हे संशोधन ट्रिपल-नेगेटिव्ह स्तन कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. २०१० ते २०२० या कालावधीत ७२० भारतीय महिलांवर संशाेधन करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
मानक केमोथेरपीसोबत कार्बोप्लाटिन दिल्यास पाच वर्षे जिवंत राहण्याचा दर ६७ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत, तर कर्करोगमुक्त राहण्याची शक्यता ६४ वरून ७१ टक्क्यांपर्यंत वाढली. विशेष म्हणजे, ५० वर्षांखालील महिलांत ही सुधारणा ६६ टक्क्यांवरून ७७ टक्क्यांपर्यंत झाली. या औषधाचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचेही या संशाेधनानंतर स्पष्‍ट झाले आहे.
-----
आंतरराष्‍ट्रीय मान्यता
जागतिक मान्यता असलेले हे संशोधन ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात २० ऑक्टोबर २०२५मध्ये प्रकाशित झाले आहे. त्याला जागतिक स्तरावर ‘प्रॅक्टिस-डिफायनिंग स्टडी’ म्हणजेच उपचारपद्धती ठरवणारा अभ्यास म्हणून मान्यता मिळाली आहे. या निष्कर्षांच्या आधारे जगभरातील उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
--
महिलांसाठी आशेचा किरण
‘भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगातील महिलांसाठी हे यश आशेचा किरण आहे. स्वस्त उपचारांनी लाखो महिलांना नवीन जीवन मिळू शकते. भारतात सुमारे ३० टक्के स्तन कर्करोग रुग्ण ट्रिपल-नेगेटिव्ह श्रेणीतील असून, ही औषधी क्रांती सार्वजनिक आरोग्य आणि कर्करोग उपचार क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारी आहे,’ असे रुग्ण हक्क कार्यकर्त्या देविका भोजवानी यांनी सांगितले.
---
कार्बोप्लाटिनसारखी स्वस्त पण प्रभावी औषधं केमोथेरपीत जोडल्यास, या आक्रमक प्रकारच्या कर्करोगात रुग्णांचे प्राण वाचवता येतात. हा वैद्यकीय दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा टप्पा आहे.”
-डॉ. सुदीप गुप्ता, संचालक व प्रमुख संशाेधक, टाटा मेमोरियल
----
भारतातील एका केंद्रातून निघालेले इतके निर्णायक आणि उच्च दर्जाचे संशोधन हे देशाच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचे प्रतीक आहे.
- डॉ. राजेंद्र बडवे, माजी संचालक, टाटा मेमोरियल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: वजन वाढेल माझं... रोहितचा केक भरवणाऱ्या जैस्वालला नकार; शेजारीच असलेल्या विराटची रिऍक्शन पाहिली का?

Mumbai Metro News: मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत! दोन मार्गिकांवर तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा

२४ रुपये रिफंडच्या नादात गमावले ८७ हजार; महिलेनं झेप्टोवरून केलेली ऑर्डर

Rajgad News : प्रशासन जागे; नागरिक खूश; सकाळ ऑनलाइन बातमी प्रकाशित होताच वेल्हे बुद्रुकमध्ये दोन हायमास्ट दिवे उभारले!

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT