मुंबई

युरोपच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू : रिलायन्स

CD

युरोपच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू : रिलायन्स
मुंबई, ता. २६ ः रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून शुद्ध तेलाची युरोपला विक्री करण्याबाबत युरोपीय युनियनच्या नियमांचे तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू, असे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
यासंदर्भात अमेरिकेने तसेच युरोपीय युनियनने रशियावर काही निर्बंध जारी केले आहेत. त्याबाबत रिलायन्सने हे स्पष्टीकरण दिले आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून शुद्ध तेलाची विक्री युरोपला करण्यासंदर्भात अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय युनियन यांनी नुकतेच लादलेल्या निर्बंधांची आम्ही दखल घेतली आहे. त्याचे परिणाम तसेच यासंदर्भात करावयाच्या आवश्यक बाबी आणि उपाययोजना याचा रिलायन्सतर्फे सध्या आढावा घेण्यात येत आहे. युरोपमधील शुद्ध तेलाच्या आयातीसंदर्भातील युरोपीय युनियनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आम्ही पालन करू. तसेच याबाबत जेव्हा जेव्हा केंद्र सरकारतर्फे काही मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, त्यांचेही नेहमीप्रमाणे पालन केले जाईल. देशाच्या ऊर्जा सुरक्षाविषयक धोरणांशी रिलायन्स नेहमीच संलग्न राहिली आहे. लागू असलेले निर्बंध तसेच नियामक चौकट यांचे पालन करण्याबाबत आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत. या गरजांनुसार आम्ही आमच्या तेल शुद्धीकरण प्रक्रियेच्या कामकाजात बदल करू, असे रिलायन्सचे म्हणणे आहे.
बाजारपेठेतील बदलते प्रवाह तसेच नियमांच्या अटी या बाबी पुरवठ्याच्या कामात प्रतिबिंबित होतात. रिलायन्स आपल्या पुरवठादारांशी असलेले संबंध कायम ठेवताना या अटींचेही पालन करेल. अनेक वर्षांच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या, आपल्या कच्चे तेल मिळवण्याच्या धोरणामुळे आम्ही घरगुती आणि युरोपसह निर्यातविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कामकाजविषयक स्थिरता प्राप्त करू शकू, याची आम्हाला खात्री आहे, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न रद्द, स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; म्हणाली...

Goa Night Club Fire Incident : गोव्यातील सिलिंडर स्फोट प्रकरणी मोठी कारवाई ! नाईट क्लब मालकाला अटक, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Viral Video: भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते, एका कर्मचाऱ्याने थांबवलं तर हत्तीणीने उचलून फेकलं!

Latest Marathi News Live Update : "इंडिगोच्या मक्तेदारीला परवानगी देणाऱ्या सरकारचे हे अपयश नाही का?..."- पवन खेरा

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT