मुंबई

कारच्या बाेनेटवरून पडून महिला गंभीर जखमी

CD

कारच्या बाेनेटवरून पडून
महिला गंभीर जखमी

कारचालक आराेपीला अटक

मुंबई, ता. २५ ः पार्टी करून कारने घरी परतणाऱ्या मित्र-मैत्रिणींत फाेन घेण्यावरून वाद झाला. त्यानंतर आराेपीने तिचाही फाेन हिसकावल्याने ती रागाने कारच्या बाेनेटवर बसली. या स्थितीत आराेपीने कार वेगाने चालवून तिला खाली पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून आराेपी कारचालक विनीत दहिया (वय ३२) याला बाेरिवली पाेलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दाेघेही दारूच्या नशेत हाेते, अशी माहिती पाेलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय जखमी महिला स्पामध्ये नोकरी करते. बुधवारी रात्री ती मित्र-मैत्रिणींसोबत एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. तेथे तिची ओळख विनीतसोबत झाली. पहाटेपर्यंत पार्टी केल्यानंतर विनीतने आपल्या मित्रांसोबत या महिलेसही घरी सोडण्याबाबत विचारणा केली. मित्रांना घरी सोडल्यानंतर ताे महिलेच्या घराच्या दिशेने निघाला. गारेगावजवळ गोराई परिसरात असताना या महिलेस फोन आला. त्याच वेळी विनीतने तिचा फोन हिसकावला. त्यावरून दोघांत वाद झाला. विनीतने तिला मारहाण करून अपशब्द वापरले. त्याने फोन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात महिला त्याच्या कारच्या बोनेटवर बसली.
तिला खाली उतरण्यास सांगूनही ती न उतरल्याने विनीतने गाडी सुरू करून वेगाने पुढे नेली. त्यात ही महिला खाली पडून गंभीर जखमी झाली. पादचाऱ्यांनी तिला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तक्रार दाखल हाेताच बोरिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने कारचे तपशील मिळवून विनीतला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accidental Gunshot Incident : धक्कादायक! शिकारीसाठी बंदूक रोखली झुडूप हालताच गोळी झाडली अन्, पुढे मित्र होता... नेमकं काय घडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : इंडिगो प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही- मुरलीधर मोहोळ

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

SCROLL FOR NEXT