मुंबई

राज्यात महिलांविरोधी रोज १३२ गुन्हे

CD

राज्यात महिलांविरोधी रोज १३२ गुन्हे
विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः सातारा आणि मुंबईतील घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२३ मध्ये देशभरात ४.४८ लाख महिलांविरोधी गुन्हे घडले. त्यात ४.५९ लाख महिला पीडित ठरल्या. यातील ४७ हजार १०१ गुन्हे (१०.५० टक्के) गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्यात पीडित महिलांची संख्या ४५ हजार ८२७ होती. २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये एक हजार ७७० गुन्हे वाढल्याचे एनसीआरबीच्या अहवालात नमूद केले आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरदिवसा सरासरी १३२ महिला पीडित ठरत आहेत. देशभरात विनयभंगाचे एकूण ८३ हजार ८९१ गुन्हे नोंद झाले. त्यातील १२ हजार १३३ गुन्हे (१४.५० टक्के) महाराष्ट्रात नोंद आहेत.
देशात बलात्कारानंतर हत्या, सामूहिक बलात्काराचे २३० गुन्हे घडले. त्यातील २९ गुन्हे महाराष्ट्रात नोंद आहेत. या गंभीर गुन्ह्यात उत्तर प्रदेश (३३) नंतर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. पती किंवा सासरच्या मंडळींकडून छळाचे राज्यात ११ हजार २२६ गुन्हे नोंद झाले. या गुन्ह्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थाननंतर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. अपहरणाचे राज्यात नऊ हजार ३६१ गुन्हे घडले. अपहरणाच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेश (१४ हजार २७२), बिहार (१२ हजार १३६) नंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

SCROLL FOR NEXT