मुंबई

पुनर्वनीकरणातील केवळ ४० टक्के झाडे जीवंत

CD

पुनर्वनीकरणातील केवळ ४० टक्के झाडे जिवंत
आरे कारशेडप्रकरणी आयआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : आरे कारशेड प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीनंतर भरपाई म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने लावलेल्या १६ हजार ०६५ झाडांपैकी केवळ ४० टक्के झाडे जगली. याबाबतचा अहवाल आयआयटी मुंबईने सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. पुनर्वनीकरणाअंतर्गत आरे येथे २८४, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सात हजार ८०६ आणि माइंडस्पेस उद्यानात सहा हजार ९७५ झाडे लावण्यात आली होती.
आयआयटी मुंबईच्या समितीने मे २०२३ मध्ये या ठिकाणी पाहणी केली. आरे आणि राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन विभागात झाडांची वाढ चांगली आढळली, तर काही भागांत केवळ ४० ते ५० टक्के झाडेच जिवंत असल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रीय उद्यानातील उतार आणि दगडी भाग, पाण्याची कमतरता आणि मलब्यामुळे झाडांची वाढ मंदावली. माइंडस्पेस येथील ‘मियावाकी’ पद्धतीच्या लागडीत सुमारे ७५ टक्के झाडे जगली असून, त्यांची वाढ समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद आहे.
---
देखभाल करार २०२८पर्यंत वाढवा
एमएमआरसीएल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यातील झाडांच्या देखभालीचा करार २०२८ पर्यंत वाढवावा, तसेच ३,५०० नव्या झाडांची लागवड करावी, अशी शिफारस आयआयटी मुंबईने केली आहे. सर्वोच्च न्यायालयात वृक्षतोडीप्रकरणी सुनावणी सुरू आहे. यासंदर्भातील अहवाल ८ जून २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून, आरेतील वृक्षतोड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पुढील आदेश अपेक्षित आहेत.
....
कुठे किती झाडे लावली?
ठिकाण लागवड वर्ष झाडांची संख्या
आरे कॉलनी २०१५ २८४
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान २०१८ ७,८०६
वीर सावरकर उद्यान, माइंडस्पेस, गोरेगाव २०२१ ६,९७५
एकूण १५,०६५
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सप्तश्रृंगी गड घाटात कार दरीत कोसळली, ओव्हरटेकच्या नादात अपघात; ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

IND vs SA: 'एक DRS माझ्यासाठीच आहे...', रोहित शर्माने उडवलेल्या खिल्लीवर अखेर कुलदीप यादव बोलला; पाहा Video

Viral: वेळेआधी कामावर जायची; बॉसने कंपनीतून काढले, महिला कोर्टात पोहोचली अन्..., प्रकरण काय?

Education Department: शिक्षण विभागाचा दणका! तब्बल ९६,८०० शिक्षकांचे वेतन कापणार; नेमकं कारण काय?

Uncontrolled Diabetes Dangers: ‘मला काही होत नाही’ म्हणणाऱ्यांनो सावध! अनियंत्रित मधुमेह देतो अशा गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT