मुंबई

चैत्यभूमी दर्शनानंतर अनुयायी परतीच्या प्रवासाला

CD

चैत्यभूमी दर्शनानंतर अनुयायी परतीच्या प्रवासाला
सीएसएमटी, दादर, एलटीटी येथे गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेले लाखो आंबेडकरी अनुयायी रविवारी परतीच्या प्रवासास लागले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वेस्थानकांवर दिवसभर गर्दीचे चित्र दिसून आले.
चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. शनिवारी दर्शन झाल्यानंतर रविवारी सकाळपासूनच अनुयायांचा मुंबईबाहेर परतीचा ओघ सुरू झाला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था उभी केली. सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ येथे विशेष सोय करण्यात आली होती. दादर आणि एलटीटी स्थानकांवरही उपलब्ध जागेत थांबण्याची सोय करण्यात आली होती. अनुयायांना त्यांच्या गावी पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वेने एकूण १५ अनारक्षित विशेष गाड्या चालविल्या. यामध्ये नागपूर, अमरावती, कलबुर्गी आदी मार्गांवरील विशेष गाड्यांचा समावेश होता. या गाड्या सीएसएमटी व दादर स्थानकांतून दिवसभरात टप्प्याटप्प्याने रवाना झाल्या. स्थानक परिसरात मार्गदर्शन, घोषणांद्वारे माहिती, तसेच रेल्वे कर्मचारी तैनात ठेवण्यात आल्याने गर्दी असूनही परिस्थिती नियंत्रणात राहिली. अनुयायांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Officer Inspiring Journey : 'पैशांची कमरता पण स्वप्नांची नाही', गरिबीला हरवत गाठले ‘क्लास वन’अधिकारी; कोल्हापूरच्या राकेशचा थक्क करणारा प्रवास

माधुरीच्या पतींची हेल्दी जर्नी! श्रीराम नेनेंनी 18 किलो वजन कसं घटवलं? सांगितलं फिटनेसचं रहस्य

Hardik Pandya-Mahieka Sharma: हार्दिकची सटकली! माहिकाचा 'त्या' अँगलने Video काढणाऱ्या paparazzi वर संतापला; म्हणाला, ती पायऱ्या उतरत असताना....

Kolhapur MSEDCL : विमा, ईएसआय, पीएफ नाही; अपघात झाला तर जबाबदार कोण? महावितरण कंत्राटी कामगारांचा थरकाप उडवणारा सवाल

Navi Mumbai: ९३५ रुपयांत नवी मुंबई ते मुंबई जलप्रवास; नेरूळ जेट्टीवरील सेवा सुरू होणार, पण कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT