मुंबई

सामाजिक संस्थांकडून स्वच्छतेची हाक

CD

सामाजिक संस्थांकडून स्वच्छतेची हाक
चैत्यभूमी परिसरात साफसफाई

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ७ : स्वच्छ चैत्यभूमी आवाहनाला आंबेडकरी अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र शिवाजी पार्क परिसरात दिसून आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ''आम्ही आंबेडकरवादी''सह विविध संस्थांच्या पुढाकाराने शिवाजी पार्क परिसराची स्वच्छता केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. या कालावधीत चैत्यभूमी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी  ''आम्ही आंबेडकरवादी'' या संस्थेचे उच्चशिक्षित तरुण एकवटले आहेत. नऊ  वर्षांपासून हे तरुण आपली भूमी, चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हा नारा देऊन सलग दोन दिवस हा परिसर स्वच्छ करतात. तसेच याविषयी प्रबोधन व जनजागृती करत आहेत. कचरा न करण्याची हाक या संस्थेकडून देण्यात आली आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

 ''आम्ही आंबेडकरवादी संस्थेचे अध्यक्ष बुधभूषण शिंदे यांनी २०१६ पासून हा उपक्रम सुरू केला आहे.  महापालिका  सोयीसुविधा पुरवते. पण अनुयायांचे येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यापुढे त्या सोयीसुविधा कमी पडतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ राहणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या पवित्र ठिकाणी अस्वच्छता  होऊ देणार नाही याची काळजी मी स्वतः घेईल, हा विचार मनामनात पेरण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यंदा १२०० स्वच्छतादूत या उपक्रमात सहभागी झाले होते.


नेहमाच्या तुलनेत यंदा चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांची गर्दी होती. मुंबई महापालिकेने चांगली व्यवस्था केली होती. समाता सैनिक दलाच्या वतीने  चैत्यभूमी आणि आजबाजूच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात  आली.
- प्रदीप कांबळे,  व्यवस्थापक, चैत्यभूमी


रस्त्यावर ओला खाऊ वाटप केल्याने कचरा जास्त होतो. तसेच तो खाऊ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही सामाजिक संघटना बाहेर सुका खाऊ वाटण्याचे आवाहन केले आहे. त्याला अनेक सामाजिक संघटनांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे अनुयायांना सोबत नेणे सोपे होईल आणि रस्त्यावरील गर्दी कमी होईल. 
- बुधभूषण शिंदे,   अध्यक्ष,आम्ही आंबेडकरवादी 


२ डिसेंबरपासून आजपर्यंत स्वच्छतेचे काम केले जात आहे. स्वच्छता ही  एक सेवा आहे. अनुयायांची गैरसोय होऊ नये, कचरा साचू नये याची आम्ही काळजी घेतो. 
- मंगेश गायकवाड,  पालिका  कर्मचारी


शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात जेवण वाटप केले जाते. त्यामुळे बाहेर सुका खाऊ दिल्यास अनुयायांना ते सोबत ठेवणे सोपे होईल. रस्त्यावरील गर्दीही कमी होईल. बाहेर खाऊ वाटप करणाऱ्या संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
- निलेश मोहिते, अध्यक्ष, दलित युथ पँथर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० वर्षात २४ बदल्या, कुठेच टीकत नाही; तुकाराम मुंढेंना बडतर्फ करण्याची भाजप आमदाराची मागणी, फडणवीसांनी दिलं उत्तर

Supreme Court : ''महिलेच्या स्तनाला हात लावणे बलात्काराचा प्रयत्न नाही'' म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर संतापले CJI सूर्य कांत; कोर्टरुमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील रमेश डाईंग दुकानाला लागलेली आग आटोक्यात, कुठलीही जीवितहानी नाही

IND vs SA 1st T20I : संजू सॅमसन, कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही जागा; पहिल्या ट्वेंटी-२० साठी निवडला भारतीय संघ

IPL 2026 Auction : राहतो ऑस्ट्रेलियात, लिलावात भारतीय खेळाडू म्हणून नाव नोंदवलंय... शुभमन गिल, अभिषेक, अर्शदीप यांच्याशी कनेक्शन; कोण आहे निखिल चौधरी?

SCROLL FOR NEXT