मुंबई

भातपिक कापणी हंगामाला प्रारंभ

CD

भातपिक कापणी हंगामाला प्रारंभ
परतीच्या पावसाने काही प्रमाणात नुकसान
मुरुड, ता. ३० (बातमीदार) ः भात पिक हे प्रामुख्याने गरवे, निम गरवे व हळवे अशा स्वरूपात विभागले जात असून ऐन दिवाळीच्या तोंडावर त्‍याच्‍या कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे. वरकस किंवा उखारु जमिनीवरचे हळवे भात कापणीला आले आहेत. मात्र परतीच्या पावसाने भात पिक आडवे होऊन मोठ्या प्रमाणात त्‍याचे नुकसान झाल्याचे चित्र तालुक्‍यात दिसून येत आहे. मागील काही दिवसात एकूण तीन हजार मिमी इतका पाऊस कोसळल्याने भात कापणीसाठी शेतकरी धजावत नसल्याची स्थिती पहायला मिळत आहे.
मुरूड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. यंदा ३८९० हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यंदा जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या असल्या तरी जुलैमध्ये हा अनुशेष भरून काढल्याने भात पिकास पोषक पर्जन्य मिळाले. परिणामी भात पीक जोमदार वाढल्याने बळीराजा आनंदात आहे. भाताच्या विविध जाती विकसित होत असल्या तरी जया, चिंटू, सुवर्णा या वाणांचे उत्पादन जमिनीला पोषक असल्याने जुन्याच वाणांना शेतकरी पसंती देत आहेत. जया व चिंटू पीक तयार झाले असून काही भागात कापणीला प्रारंभ झाला आहे. सतत पाऊस कोसळत असला तरी यंदा कीडीचे प्रमाण फारसे नसल्याने विशेष नुकसान दिसत नाही. भातपीक तयार झाल्यानंतर परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने पीक आडवे झाले आहे. उभ्या पीकापेक्षा जमिनीवर लोळलेल्या ओंब्या पक्षी अधिक फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
............
पीक विम्याचे निकष बदला
पंतप्रधान पीक योजनेच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांनी विशेष लक्ष न दिल्याचे चित्र तालुक्‍यात दिसून येत आहे. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आजमितीस रुपयाची ही भरपाई विमा कंपन्या देत नसल्याची तक्रार आहे. मुरुड तालुक्यात केवळ ११७७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. चोला मंडळ जनरल इन्सुरन्स कंपनीने काढणी पश्चात भाताचे नुकसान झाल्यास विम्याचे संरक्षण देण्याचे जाहीर केल्याने या प्रकारात शेतकरी बसत नसल्याने कोकणात पीक विम्याचे निकष बदलले पाहिजेत, अशी मागणी किसान क्रांती राज्य संघटनचे उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palash Muchhal : "मी माझ्या आयुष्यात..." ; स्मृती मानधनासोबत लग्न रद्द झाल्यानंतर पलाश काय म्हणाला? कायदेशीर कारवाईचा इशारा...

Nagpur Winter Session: नागपूर अधिवेशनासाठी ‘रेड कार्पेट’! लोकभवन ते विधानभवन झळाळले, आठवडाभर गजबजणार उपराजधानी

Virat-Arshdeep Video: 'धावा कमी पडल्या, नाही तर आणखी एक शतक झालं असतं'' अर्शदीपच्या वाक्यावर कोहलीने दिलं मजेशीर उत्तर...पाहा व्हिडीओ

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात लागली आग

धक्कादायक! बीडमध्ये घरात घुसून ग्रामरोजगार सेवकावर गावगुंडांचा जीवघेणा हल्ला; दुचाकीला बांधून चौकात नेले ओढत, लोखंडी रॉड घातला डोक्यात

SCROLL FOR NEXT