मुंबई

कचऱ्यामुळे पार्कसाईटवासीयांचे आरोग्य धोक्यात

CD

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) : विक्रोळी पार्कसाईट येथील आनंदगड भागातील अनेक नाले तुंबल्याने संपूर्ण परिसर कचरामय झाला आहे. गल्लीबोळात आणि चाळीमध्ये कचरा आणि राडारोडा साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
आनंदगड भागात चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहिवाशांना श्वसनाचा आणि घशाचा त्रास जाणवत आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांवर याचा जास्त परिणाम झाल्याचे दिसून येते. याच ठिकाणी असलेल्या श्री कृपा सोसायटीच्या बाजूला असलेल्या गटाराची दुरवस्था झाली असून हे गटार कधीही खचू शकते. त्यामुळे याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व्हावी, अन्यथा हे गटार खचल्यास संपूर्ण विभाग पावसाळ्यात जलमय होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली असून पालिकेने लवकरात लवकर या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी केली आहे.
….
घराच्या बाजूला असलेल्या गटाराची दुरवस्था झाली असून ते कधीही खचू शकते, त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अन्यथा संपूर्ण विभागात पाणी शिरण्याची भीती आहे. ही भिंत खचल्यास माझ्या घरालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
- बृजराज यादव, रहिवासी

कायमस्वरूपी उपाय हवा
वृशांक सुरवाडकर यांनी सांगितले की, डोंगर भागातून आलेल्या कचऱ्यामुळे नेहमीच नाले भरून पाणी घरांमध्ये घुसते. पालिकेने यावर कायमस्वरूपी उपाय करावा. सध्या पालिकेचे काही कर्मचारी कचरा उचलण्याचे काम करत आहेत.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT