मुंबई

खारघरमध्ये आमदार ठाकूर यांची प्रचार रॅली

CD

खारघर, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार रॅलीला मंगळवारी (ता. २९) खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खारघर गावातील चेरोबा मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. खारघर वसाहतीतील सेक्टर बारामधील ब्लॉक ए ते एफ व शेवटी शिवमंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली होती. आम्ही कामावर जास्त विश्‍वास ठेवतो. अनेक जण आरोप करतात; मात्र जनतेची कामे करण्याची धमक लागते, ती धमक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे सांगून येत्या २० नोव्हेंबर रोजीच्या मतदानादिवशी कमळासमोरील बटण दाबून विकासाच्या दिशेने पाऊल उचलून पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना केले. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, नीलेश बावीस्कर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, आरपीआयचे पनवेल महानगर अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa Fire Incident 23 Dead : गोवा नाईट क्लबमध्ये आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू; आगीचे नेमकं कारण काय? डीजीपींनी दिली अधिकृत माहिती

Goa Nightclub Fire : नाईट क्लबमधील आगीच्या घटनेला कोण जबाबदार? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

DMart Sale : डिमार्ट स्टोअर की DMart रेडी ऑनलाइन अ‍ॅप..कुठून खरेदी करणे जास्त स्वस्त? डिस्काउंट अन् अधिक फायदा हवाय..मग हे एकदा बघाच

Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रिमंडळ आज उपराजधानीत होणार दाखल; अतिवृष्टी, आर्थिक स्थितीवरून विरोधक सरकारला घेरणार

Goa Nightclub Fire : गोव्यात नाईट क्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू; राष्ट्रपती अन् पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

SCROLL FOR NEXT