मुंबई

.........................

CD

राज्यात लवकरच हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : राज्यात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार आहे. सुरुवातीला तीन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुमीत एसएसजी या कंपनीने नुकतीच दिली. ही सेवा महाराष्ट्र सरकारच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) १०८ अंतर्गत दिली जाणार असून ती विनाशुल्क असेल. तसेच, पहिल्या टप्प्यात ३००हून अधिक रोड ॲम्ब्युलन्स आणि पाच बोट ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

राज्य सरकार सुमित फॅसिलिटीज लिमिटेड, इंडिया आणि स्पेनच्या एसएसजी ट्रान्सपोर्ट सॅनिटारियो एसएलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे. नवीन भागीदारीनुसार १,७५६ नवीन रुग्णवाहिका आणण्यात येणार आहेत.

एसएसजीचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, १,७५६ रुग्णवाहिकांपैकी २५५ अत्याधुनिक आहेत. लाइफ सपोर्टमध्ये १,२७४ बेसिक लाइफ सपोर्ट, ३६ मुलांसाठी विशेष रुग्णवाहिका, १६६ मोटरसायकल रुग्णवाहिका, १० समुद्री बोट रुग्णवाहिका आणि १५ नदी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका पाच टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये ३०० ते ४०० नवीन रुग्णवाहिका सेवेत आणण्यात येणार आहेत. ज्यामध्ये पाच सागरी बोट रुग्णवाहिकांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात एअर ॲम्ब्युलन्स सेवा देणे अपेक्षित आहे.

अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी पुण्यात आपत्कालीन प्रतिसाद केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. या केंद्रात उपस्थित असलेल्या विविध रोगांचे तज्ज्ञ रुग्णवाहिकेत उपस्थित डॉक्टरांना रुग्णाला प्रथमोपचार देण्यासाठी मदत करतील. फाईव्हजी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या रुग्णवाहिकेत रुग्णांच्या उपचाराशी संबंधित २५ हून अधिक उपकरणे असतील.
..............................................
२० मिनिटांत सेवा
एखाद्या व्यक्तीने आपत्कालीन प्रतिसाद केंद्राशी संपर्क साधल्यानंतर २० ते ३० मिनिटांच्या आत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होईल. याशिवाय रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास रुग्णवाहिकेच्या आधी मोटरसायकल रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून रुग्णाला प्राथमिक उपचार देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करेल.
----
उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने सज्ज
प्रगत रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल्स (एमडीटी), टॅबलेट पीसी, आरएफआयडी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रीयाज सिस्टीम यांसारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. तसेच, अंगभूत कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (सीआरएम), कॉम्प्युटर-एडेड डिस्पॅच (सीएडी), व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीटीएमएस) आणि पेशंट अरायव्हल इंटिमेटेशन सिस्टीम या प्रणालीही असणार आहे.
----
ताफ्यात या रुग्णवाहिका
सुमीत एसएसजीच्या रुग्णवाहिका ताफ्यात अत्याधुनिक जीवरक्षक रुग्णवाहिका (एएलएस), बेसिक जीवरक्षक रुग्णवाहिका (बीएलएस), नवजात शिशूंसाठीच्या रुग्णवाहिका, त्वरित प्रतिसाद देणाऱ्या बाईक, समुद्र आणि नदीतून प्रवास करण्यासाठीच्या नौका रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. तसेच, ‘एमईएमएस १०८’ या उपक्रमातील या ताफ्यात वैद्यकीय मदत पुरविणारे ड्रोन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणारे हेलिकॉप्टर यांचाही समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

Indigo Crisis : ६१० कोटी दिले रिफंड, ३ हजार बॅग्जही पोहोचवल्या; आज इंडिगोच्या १६५० विमानांचं उड्डाण

Mangalwedha News : खरीप ते रब्बी; प्रत्येक हंगामात दुबार पेरणी; शेतकऱ्यांच्या व्यथेला शासनानं कधी दाद द्यायची!

SCROLL FOR NEXT