मुंबई

वसईकरांसाठी सांगितिक मेजवानी

CD

वसई, ता. ३१ (बातमीदार) : दिवाळी सणाला खुसखुशीत चकलीसोबत पहाट गीतांच्या फराळाची शहरातील रसिकांना मेजवानी मिळाली. त्याला वसई-विरारमधील नागरिकांनी भरभरून दाद मिळाली. या कार्यक्रमाचे निमित्त होते ते म्हणजे वसई वाय. एम. सी. एम. सभागृहात महापालिकेकडून आयोजित ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हा गीतांचा कार्यक्रम.

‘लख लख चंदेरी तेजाची’ या गीताने दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात आली. त्यानंतर एकापेक्षा एक अनेक बहारदार गाण्यांची मैफल रंगत गेली व वसईकर रसिक मंत्रमुग्ध झाले. सप्तसुरी बहारदार गीतांची मैफल सजली होती. गायक अजित परब, सुगंधा दाते, ओंकार प्रभुघाटे, माधुरी करमरकर या गायकांनी गाणी सादर केली. त्यांना वादक म्हणून प्रशांत लळित, सागर साठे, विजय तांबे, सूर्यकांत सुर्वे, प्रभाकर मोसमकर, अभिजित सावंत यांची साथ मिळाली. सुसंवादिका मंगला खाडिलकर यांनी ज्येष्ठ गायक, संगीतकारांच्या आठवणींना उजाळा दिला व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या वेळी महापालिकेच्या कला-क्रीडा व आस्थापना विभागाचे उपायुक्त सदानंद पुरव, सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस, संजू पाटील, माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, माजी सभापती संदेश जाधव, नितीन राऊत, अशोक मुळे, विजय वर्तक, पुष्पा जाधव, प्रकाश वनमाळी, कल्पेश मानकर, मीना अडसूळ, स्नेहल वेदपाठक, माया तळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

गायक ओंकार प्रभुघाटे यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘इंद्रायणी काठी’, गायिका माधुरी करमकर यांनी ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, मंगेश पाडगावकर यांचे ‘लाजून हासणे अन हासून ते पहाणे’ हे गाणे गायक अजित परब, तर ‘गोरी गोरी पान’ हे गाणे सुगंधा दाते यांनी सादर केले. ‘घनराणी साजणा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘काटा रुते कुणाला’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘राजाच्या रंगम्हाली’, ‘लटपट लटपट तुझं चालणं’, ‘विंचू चावला’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठूचा गजर हरिनामाचा’, ‘गुंतता हृदय’ हे नाट्यपद, ‘या जन्मावर, या जगण्यावर’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‘नवीन आज चंद्रमा’, ‘नवीन आज यामिनी’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘दिस चार झाले मन’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत येना’ अशा अनेक गाण्यांनी रसिकांना दिवाळीच्या पहिल्या पहाटे नवी ऊर्जा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Railway Ticket: एआय तिकिटांचा सुळसुळाट! विशेष स्क्वॉड तैनात, बनावट तिकीट आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास अन्...; रेल्वेची मोठी मोहीम

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

झी मराठीवर येतेय नवी मालिका 'शुभ श्रावणी'; दोन बड्या कलाकारांचं कमबॅक; पण आताही ओरिजनल नाहीच, प्रोमो पाहिलात?

Crime: सून सतत मोबाईवर व्यस्त; सासरे अन् दिराने फोन हिसकावला, संतापून महिलेचं धक्कादायक कृत्य, काय घडलं?

खांद्यावर पदर, सिंपल लूक अन् गुलाबी ग्लो, महाराष्ट्राची वहिनी जेनिलियाचा लूक पाहिला का? रितेशसोबतचा हटके Viral Video

SCROLL FOR NEXT