भाववाढीनंतरही मिठाई खरेदीला गर्दी
दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या
जीवन तांबे ः सकाळ वृत्त
चेंबूर ता. ३१ ( बातमीदार) ः दिवाळी सणामध्ये मिठाईला विशेष महत्त्व असते. यंदा भाव वाढूनही मिठाईच्या खरेदीला नागरिकांची गर्दी होत आहे. काजू कतली, सोनपापडी, बालूशाही विविध चवीची मिठाई खरेदी केली जात आहे. मिठाईच्या भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मावा व ड्रायफ्रूट मिठाई खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी आपण घरामध्ये फराळ बनवतो, तसेच पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी मोठया प्रमाणात मिठाई खरेदी केली जाते.
सध्या मिठाई दुकानांमध्ये स्पेशल काजू कतली, स्पेशल मिक्स मिठाई, केशर काजू कतली, मलाई टोटा, मलाई केशरी पेढा, स्पेशल घी सोन पापडी, स्पेशल घी बुंदी लाडू, बेसन लाडू, मँगो, अंजीर बर्फी, चॉकलेट बर्फी, मँगो बर्फी, शेव बर्फी, बदाम, पिस्ता, काजू बर्फी, बालुशाही, बेसन लाडू, रवा लाडू, करंजी, रसगुल्ला, माहीम हलवा, गुजिया, मैसूर बर्फी, विविध प्रकारच्या मावा बर्फी अशा २०० हून अधिक महाराष्ट्रीयन, बंगाली व राजस्थानी मिठाईंची रेलचेल दिसत आहे.
मीठाईबरोबर चिवडा, चकली, फरसाण, अनारसे, मधुमेह व ज्येष्ठ नागरिकांसाठी शुगर फ्री पदार्थ घालून तयार बनवण्यात येणारी अंजीर बर्फी, ड्रायफ्रूट, गुळापासून बनवलेल्या मिठाईला ग्राहकांची मोठी मागणी आहे.
ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे दर्जेदार मालाचा वापर करून मिठाई तयार करतो. त्यामुळे प्रत्येक सणाला आमच्या मिठाईला मोठी मागणी असते. यावर्षी विविध शुगर फ्री मिठाई, काजू, मावा बर्फीला सर्वाधिक मागणी आहे.
श्रीनाथ- भूषण पैयाडे,
मिठाईविक्रेते
बाजारात विविध प्रकारच्या मिठाई येत असतात. आमच्या मिठाईचा दर्जा योग्य असल्याने ग्राहक मिठाई खरेदी करतात.
नितीन चोएके, मिठाईविक्रेते
कार्यालयातील कर्मचारी व नातेवाइकांना चांगली मिठाई गिफ्ट द्यावी लागते. त्यामुळे चांगल्या मिठाई दुकानातून आम्ही मिठाई खरेदी करतो. भाव वाढला तरी मिठाई घ्यावी लागते.
राज लोखंडे, ग्राहक
मिठाईचे भाव प्रतिकिलो
शुगर फ्री बर्फी - १,५०० ते २००० रुपये किलो
गुळाची विविध बर्फी- १,५०० रुपये किलो
काजू बर्फी- १,२६० रुपये किलो
केशर पिस्ता काजू कतली बर्फी- १,५०० रुपये किलो
मलाई टोटा - ८८० रुपये किलो
काजू अंजीर कत्तभली - १,४४० ते २००० रुपये किलो
मलई चॉकलेट बर्फी, अंजीर बर्फी, शेव बर्फी - १,२०० ते २००० रुपये किलो
केशर काजू पेढा - १,४४० रुपये किलो
बालुशाही- ८०० रुपये किलो
स्पे.घी सोनपापडी ८४० रुपये किलो
स्पे.घी बुंदी लाडू - ८४० रुपये किलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.