मुंबई

मुक्तसंवाद दिवाळी अंक परीक्षण

CD

मुक्तसंवाद दिवाळी अंक परीक्षण
माणूसपणाचा शोध
दिवाळी अंकाचे नाव : समतावादी मुक्त- संवाद
किंमत : -
पाने : १७२

जग जसे उत्क्रांत होत जात आहे, तस-तसा मानवी मेंदू अधिकाधिक विकसित होत आहे; मात्र माणसातील स्वार्थी वृत्ती जगावर राज्य करू पाहते. दिवसेंदिवस अधिकाधिक विकसित होत जाणारे तंत्रज्ञान मानवी प्रगतीला पूरक ठरण्याऐवजी वैश्विक विध्वंसाला हातभार लावत आहे. त्यामुळे माणसाचे मन, बुद्धी, भावना आणि तर्काचा अभिमान बाळगत असताना संवेदनांचा परिघ विस्तारावा यासाठी अंकात भाष्य करण्यात आले आहे. काशीनाथ सिंह हे हिंदी साहित्यविश्वातील मोठे नाव आहे. ''काशी का अस्सी'', ''रेहन पर रग्घू'', ''अपना मोर्चा'' या कादंबऱ्यांनी हिंदी साहित्यविश्वात तुफान खळबळ माजवली होती. याच काशीनाथ सिंह यांची नरेंद्र बंडबे यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचे भाषांतर आणि शब्दांकन प्राजक्ता थोरात यांनी केले आहे. आद्य भारतीय कुष्ठसेवक म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या मनोहर दिवाण यांच्या कार्याचा आढावा विजय प्र. दिवाण यांनी घेतला आहे. विजय दिवाण हे सर्वोदयचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. प्रसिद्ध ललित लेखक गणेश मनोहर कुलकर्णी यांनी दख्खन प्रांतात विजेवर चालणारी अन् रुळावरची साम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या डेक्कन क्वीनचा ऐतिहासिक धांडोळा घेतला आहे. नॅशनल इंटिग्रेशन मेडिकल असोसिएशनचे प्रणेते डॉ. संगप्पा इरप्पा नागराळ (१९३३-२०२०) यांनी असंख्य डॉक्टर घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य जणांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव उंचावले, त्यातीलच एक असलेल्या डॉ. विवेक कोरडे यांनी नागराळ यांचे लक्षवेधी व्यक्तिचित्र आपल्यासमोर रेखाटले आहे. त्याचबरोबर क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांनी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या अपयशाची कारणे उलगडून सांगितली आहेत. त्याचबरोबर हितेश पोतदार यांनी भारतातील औद्योगिक अपघात व कामगार नियमांचा ऊहापोह ''माणूस झाला सस्ता..'' या लेखातून केला आहे. प्रा. अविनाश कोल्हे, राजा पटवर्धन, सायली परांजपे, सुमती जोशी यांच्या लेखांचा आस्वाद घेता येईल. ज्येष्ठ संपादक जयदेव डोळे यांनी मराठी वृत्तपत्रे व त्यांच्या भूमिका याचा आढावा घेतला आहे. भावेश ब्राह्मणकर यांनी सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी गावांनी जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धन घेतलेल्या पुढाकाराकडे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT