भिवंडी, ता.१८ (वार्ताहर)ः जंगल उद्ध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातही जपानी उद्यान तंत्रज्ञानातून मियावाकी उद्यान उभारले जात आहे.
पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत अहमदाबाद येथील कॅच फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या या उद्यानाचा शुभारंभ मंगळवारी आयुक्त अनमोल सागर यांच्याहस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, विठ्ठल डाके, कॅच फाउंडेशनचे अध्यक्ष भरत सिसोदिया, भरतपीरम अँड व्हॅक्सीन लि.कंपनी, मुंबईच्या डॉ. अपूर्वा पवार, उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अ.ह. साबळे,पालिका उद्यान अधीक्षक नीलेश संखे, स्थानिक प्रभाग समिती क्रमांक ५ चे सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव,जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. पालिकेचे गहे चौथे मियावाकी उद्यान असून नजराणा स्मशान भूमी, कामतघर उद्यान व फेणेगाव येथे उद्यान निर्मिती करण्यात आली आहे.
-----------------------------------------
उद्यानात ३५ स्थानिक प्रजातींच्या चार झाडांची वृक्षलागवड केली जाणार आहे. सामाजिक संस्था पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेऊन या उद्यानाच्या माध्यमातून शहराचा पर्यावरण समतोल राखण्याचे कार्य करीत आहेत.
- अनमोल सागर, आयुक्त, भिवंडी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.