मुंबई

श्रीवर्धनच्‍या तहसीलदारांकडून आदिवासी मुलाला शासकीय मदत

CD

श्रीवर्धनच्‍या तहसीलदारांकडून आदिवासी मुलाला शासकीय मदत
श्रीवर्धन, ता. २६ (बातमीदार) : प्रशासनातील अधिकारी संवेदनशील असतील, तर समाजातील दुर्बल घटकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण श्रीवर्धनचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी घालून दिले आहे. तालुक्यातील वडवली येथील एका अनाथ आदिवासी मुलाला त्यांनी रेशन कार्ड मिळवून दिले.
गणेश वाघमारे हा लहानपणीच आई-वडिलांना गमावून पूर्णपणे अनाथ झाला. त्यावेळी गावातील प्रभाकर आणि प्रेमळ चौलकर या दांपत्याने त्याला आपला मुलगा मानून स्वीकारले आणि शिक्षणासाठी शाळेत दाखल केले. मात्र कोविड काळात प्रभाकर चौलकर यांचे निधन झाले. त्यानंतर प्रेमळ चौलकर यांनी एकटीने गणेशचे संगोपन सुरू ठेवले. गणेश सध्या इयत्ता पाचवीत शिकत आहे. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असल्याचे समजल्यावर प्रेमळ चौलकर यांनी मदतीसाठी आगरी समाज वडवली माजी अध्यक्ष संतोष भायदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष निलेश नाक्ती यांच्या मदतीने तहसीलदार वाकलेकर यांची भेट घेतली व संपूर्ण परिस्थिती सांगितली. कोणतेही अधिकृत पुरावे नसतानाही, केवळ आधार कार्ड, तलाठी अहवाल व पंचनाम्यावर विश्वास ठेवत तहसीलदार वाकलेकर यांनी मानवतेचा धर्म पाळत गणेशसाठी रेशन कार्ड तयार करून दिले. तसेच शासनाची ‘अंत्योदय योजना’ लागू करून दरमहा २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू मोफत मिळण्याची सोय केली. याखेरीज ‘संजय गांधी निराधार योजना’ अंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळण्यासाठीही मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT