मुंबई

गुन्हा दाखल तरी प्रदूषणकारी प्लांट सुरू

CD

विरार, ता. १६ (बातमीदार) : सरकारची कोणतीही परवानगी न घेता ससूनवघर व मालजीपाडा परिसरात सुरू असलेल्या आर.एम.सी. मिक्सर प्लांट आणि डांबर प्लांटवर नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरी हे प्लांट अजूनही सुरूच आहेत. यावर आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष भूपेश कडुलकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत या डांबर प्लांटला संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या आदेशानुसार, ग्राम महसूल अधिकारी सुशील मोराळे यांनी या परिसरात तपासणी केली. तपासणीदरम्यान ससूनवघर व मालजीपाडा परिसरात एकूण २८ प्लांट अवैध सुरू असल्याचे समोर आले. त्या‍नुसार नायगाव पोलिस ठाण्यात ७ जूनला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक करे करत आहेत. या प्लांटमुळे परिसरात ध्वनी व धूळ प्रदूषण होत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. याशिवाय प्लांटमधून निघणारे सांडपाणी सार्वजनिक झऱ्यांमध्ये सोडल्याने जलप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. विरुद्ध दिशेने निघणाऱ्या गाड्यांमुळे अनेक अपघातही होत आहेत. प्लांट उभारणीदरम्यान अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने महामार्गावर साचते. परिणामी, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दर पावसाळ्यात जलभराव होतो आणि वाहतूक ठप्प होते. याशिवाय, गुन्हा दाखल होऊनही हे प्लांट आजही सुरू आहेत. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कोणत्या दबावाखाली याकडे दुर्लक्ष केले, याचा खुलासा व्हावा, अशी मागणी कडुलकर यांनी केली आहे.

कांदळवनांची कत्तल
कांदळवनांची कत्तल करून अनेक भूमाफियांनी १५ फुटी भराव टाकला आणि शेकडो एकर जागा बेकायदा व्यापली. त्यावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचे भाडे मिळवले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी मागणीही भूपेश कडुलकर यांनी केली.

दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
जर हे प्लांट तत्काळ बंद झाले नाहीत, तर अधिवेशनात या विषयावर प्रश्न उपस्थित करून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच महसूल विभागातील काही अधिकारी कांदळवन कत्तलीच्या वेळी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा अधिकाऱ्यांविरोधातही तत्काळ कारवाई करण्याची मागणी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Nashik Elections : मतदारयादीत मनमानीला चाप; आयोगाचे प्रभागनिहाय याद्यांसाठी कठोर निर्देश!

Nagpur News: नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून संपवलं जीवन; पती-पत्नीसह तीन मुलांचा समावेश, का घेतला असा निर्णय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT