मुंबई

उरण रेल्‍वे स्‍थानक समस्यांच्या गर्तेत

CD

उरण रेल्‍वेस्‍थानक समस्यांच्या गर्तेत
अनेक ठिकाणी शौचालय बंद; गैरसोयींमुळे प्रवासीवर्गात संताप
उरण, ता. २० (वार्ताहर) ः अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण लोकल सुरू झाली. यामुळे उरण- नेरूळ व उरण-बेलापूर लोकलने उरणकरांचा पनवेल, नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला, मात्र अल्‍पावधीत सिडको तसेच रेल्‍वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांचा सामना उरणकरांना करावा लागत आहे. उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चार रेल्वेस्‍थानकातील शौचालयांची दुरवस्था झाली असून, काही स्‍थानकात अद्यापही ते सुरू करण्यात आलेले नाहीत. त्‍यामुळे महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे. त्‍याशिवाय रेल्वेस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, सार्वजनिक शौचालयाची कमतरता आणि पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी भरणे तसेच स्थानकावर पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय स्‍थानकातील विविध गैरसोयींमुळे उरणकरांची परवड होत आहे.
उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सुरू करण्यात आली आहे. उरण-नेरूळ मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील काही महिन्यांपासून प्रवासीसंख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत चालली आहे, मात्र त्‍यादृष्टीने प्रवाशांना स्‍थानकातील अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चारही रेल्वेस्थानकात सध्या विविध समस्यांशी प्रवाशांना लढा द्यावा लागत आहे. या चार रेल्वेस्थानकांपैकी उरण रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र देखभालीअभावी शौचालयामध्ये प्रचंड घाण जमा झाली असून, स्‍थानकात दुर्गंधी पसरत आहे. शौचालयातील नळ तुटले आहेत. रेल्वे सुरू झाल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत रेल्वे स्थानकांची दुर्दशा झाली आहे. स्‍थानक कार्यालयात बसविण्यात आलेल्या एअर कंडिशनचे पाणी गॅलरीत पडत असल्यामुळे भरउन्हाळ्यात प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. येथील स्‍थानकांत पावसाळ्यात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. गेल्या वर्षी पावसाळ्यात या स्थानकातील भुयारी मार्गात गुडघाभर पाणी भरले होते. त्यामुळे यावर्षीदेखिल ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, मात्र यंदा रेल्वे प्रशासनाने त्यासाठी पूर्वतयारी केली असून, रेल्वे मार्गात पाणी भरल्यास ते काढण्यासाठी पाच जनरेटर मोटार पंप आणले आहेत.
....................
छ्प्पर, लाद्यांची नादुरुस्‍ती
द्रोणागिरी रेल्वेस्‍थानकामधील शौचालये बंद असून, काही ठिकाणी छपराचे पत्रे निखळले आहेत. अनेक ठिकाणी लाद्या उखडल्या असून, त्या कित्येक महिन्यांपासून बसविण्यात आलेल्या नाहीत. या समस्यांबरोबरच उरण रेल्वे मार्गावर प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. त्‍यामुळे अनेकदा प्रवाशांना तासभर स्‍थानकात रेल्‍वेची प्रतीक्षा करावी लागते, तर रात्री उशिरा रेल्वेच्या फेऱ्या बंद असल्यामुळे नोकरदार तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनादेखील कामावरून घरी येताना खासगी वाहनांचा किंवा एनएमएमटीचा आधार घ्यावा लागतो.
.......................
रेल्वेस्थानक सुरू होऊन दीड वर्षे होत नाही तो अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. द्रोणागिरी रेल्वेस्थानकात तर शौचालयही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे महिलांसह पुरुषांचीही गैरसोय होत आहे. स्‍थानकातील पत्रे तुटले आहेत, लाद्या उखडल्या असून, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
-कुंदन फुलडाले, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT