मुंबई

जिल्हा परिषदेसाठी मोखाड्यातून ‘महिलाराज’

CD

मोखाडा, ता. १६ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या मोखाडा तालुक्यातील आसे, पोशेरा आणि खोडाळा या जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून गटाची मोर्चेबांधणी केलेल्या विविध राजकीय पक्षांतील पुरुष पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेत निवडून जाण्यासाठी त्यांनी बघितलेले स्वप्न भंगले आहे. जिल्हा परिषदेत आता मोखाड्याचे प्रतिनिधित्व रणरागिणी करणार आहेत. त्यामुळे या जागांसाठी राजकीय पक्षांनी सक्षम महिला उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.

पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील मातब्बर इच्छुकांनी गेल्या पाच वर्षांपासून गटाची मोर्चेबांधणी केली होती. गतवेळी आसे जिल्हा परिषद गट ओबीसी, तर पोशेरा आणि खोडाळा गट अनुसूचित जमाती महिला राखीव होता. या वेळी खोडाळा किंवा पोशेरा गट ओबीसी अथवा अनुसूचित जमाती सर्वसाधारण होईल, अशी अपेक्षा राजकीय पदाधिकाऱ्यांना होती.

छोटा तालुका असलेल्या मोखाड्यातील केवळ तीन जिल्हा परिषद गटांचा पालघर जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा प्रभाव राहिला आहे. त्यादृष्टीनेच या वेळेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून अनेकांनी पक्षांतर केले; मात्र तालुक्यातील तिन्ही जागांचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव पडल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी गटामध्ये जंग जंग पछाडलेल्या इच्छुक उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे. त्यांना आता पुन्हा पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागणार असून तालुका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहे. जिल्हा परिषद जागा महिला राखीव झाल्याचे कळताच सक्षम उमेदवाराचा शोध राजकीय पक्षांनी सुरू केला आहे. काही दिग्गजांनी आपल्या ‘होम मिनिस्टर’ला या निवडणुकीत उतरवण्याची फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa : नाइटक्लबचा मालक गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर, २२ शहरं आणि ४ देशांमध्ये व्यवसाय; कोण आहे सौरभ लुथरा?

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना थंडीचा इशारा! हवामानविषयी दिली मोठी अपडेट, विभागानं नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मंगला लक्षदीप ट्रेनमध्ये खुलेआम दारू गुटका व अमली पदार्थांची विक्री

Agricultural News : 'एकरी पाच क्विंटल' जाचक अटीमुळे शेतकरी हैराण; सीसीआय खरेदीकडे कापूस उत्पादकांची पाठ!

टीआरपी कमी झाला की पटकन पात्राला मारून टाकतात... मालिकांबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोखठोक सवाल

SCROLL FOR NEXT