मुंबई

विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप

CD

विरार ते मरीन ड्राइव्ह प्रवास जलद
‘उत्तन-वसई-विरार सी लिंक’ला पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी
विरार, ता. २४ (बातमीदार) : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या ‘उत्तन-वसई-विरार सी लिंक’ (यूव्हीएसएल) प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पालघर, वसई-विरार आणि डहाणू येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, विरार ते थेट दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास आता अखंडित आणि सिग्नलमुक्त होणार आहे.
सध्या विरार ते वर्सोवा हे अंतर कापण्यासाठी जवळपास दोन तास लागतात, पण हा सागरी पूल पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण कमी होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा प्रकल्प साकारला जात आहे.
सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च ८७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला होता; मात्र सुधारित तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकनानंतर मार्गिकांची संख्या कमी करून (तीन अधिक तीन मार्गिका) आणि स्तंभांची रचना बदलून हा खर्च आता ५२,६५२ कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे, तर निधी व्यवस्था जपान इंटरनॅशनल कुफ्रेशन एजन्सी (जिका) ७२.१७ टक्के (पथकर वसुलीतून परतफेड) आणि महाराष्ट्र सरकार/एमएमआरडीए २७.८३ टक्के (भांडवली स्वरूपात) अशी असणार आहे.
दरम्‍यान, प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी, त्यामुळे काही प्रमाणात खारफुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘विशेष उद्देश वाहन’ (एसपीव्ही) स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रकल्पाचा तपशील आणि जोडणी
- एकूण लांबी : ५५.१२ कि.मी.
- मुख्य सागरी पूल : २४.३५ कि.मी. (उत्तन ते विरार)
- उत्तन कनेक्टर : ९.३२ कि.मी. वर्सोवा-भाईंदर-दहिसर कोस्टल रोडशी जोडणार
- वसई कनेक्टर २.५० कि.मी. पूर्णपणे उन्नत मार्ग
- विरार कनेक्टर : १८.९५ कि.मी. थेट दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेशी (वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग) जोडणार

प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना
हा सी लिंक केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरशी थेट संपर्क साधणार असल्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palash Muchhal : "मी माझ्या आयुष्यात..." ; स्मृती मानधनासोबत लग्न रद्द झाल्यानंतर पलाश काय म्हणाला? कायदेशीर कारवाईचा इशारा...

Nagpur Winter Session: नागपूर अधिवेशनासाठी ‘रेड कार्पेट’! लोकभवन ते विधानभवन झळाळले, आठवडाभर गजबजणार उपराजधानी

Virat-Arshdeep Video: 'धावा कमी पडल्या, नाही तर आणखी एक शतक झालं असतं'' अर्शदीपच्या वाक्यावर कोहलीने दिलं मजेशीर उत्तर...पाहा व्हिडीओ

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत मुलींचा सहभाग ठरला लक्षवेधी

धक्कादायक! बीडमध्ये घरात घुसून ग्रामरोजगार सेवकावर गावगुंडांचा जीवघेणा हल्ला; दुचाकीला बांधून चौकात नेले ओढत, लोखंडी रॉड घातला डोक्यात

SCROLL FOR NEXT