मुंबई

जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

CD

अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह इतरांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ (पश्चिम) येथील सर्वोदयनगर परिसरात राहणारा गणेश विसपुते (२६) हा व्यवसायाने वाहनचालक आहे. काही महिन्यांपूर्वी सर्वोदय नगरजवळील डम्पिंग ग्राउंड परिसरात दिग्विजय ऊर्फ दिघ्या पिसाळ, अशोक म्हाडीक आणि त्यांच्या काही साथीदारांनी एकत्र येऊन विसपुते यांना लाथा-बुक्क्यांनी; तसेच विटांनी मारहाण केली. या हल्ल्यात विसपुते यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतरही आरोपींनी वारंवार विसपुते यांना धमकावणे सुरूच ठेवले. त्यांनी समोर भेटून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. या सततच्या धमक्या आणि मारहाणीमुळे भयभीत झालेल्या विसपुते यांनी अखेर अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस तपासानुसार पिसाळवर यापूर्वीही एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा आणि परिसरात दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी पिसाळ, म्हाडीक आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास अंबरनाथ पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

SCROLL FOR NEXT