मुंबई

सावित्रीबाई फुले नाट्यगृहाला नवा रंग

CD

सावित्रीबाई फुले नाट्यगृहाला नवा रंग
नूतनीकरणासाठी १५ कोटींचा निधी मंजूर

डोंबिवली, ता. २६ (सकाळ वृत्तसेवा) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाला आता नवा आणि आकर्षक लूक मिळणार आहे. अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेल्या या नाट्यगृहाचे नूतनीकरण, पुनर्विकास आणि सौंदर्यीकरण मुलुंड येथील सुप्रसिद्ध कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

२० वर्षांहून अधिक जुने असलेले हे नाट्यगृह अनेक त्रुटी आणि दुरवस्थेमुळे नेहमीच टीकेचा विषय ठरले होते. मे महिन्यात एका नाट्यप्रयोगादरम्यान प्रेक्षागृहातील छताचा काही भाग कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने ते तत्काळ बंद केले. बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्याने बांधणी करणे आवश्यक असल्याने, पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची नव्याने आखणी करण्यात आली. या नूतनीकरणाच्या कामासाठी पालिका प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली होती. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि पालिकेला १५ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

नूतनीकरणाची प्रक्रिया
पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नाट्यगृहाची पुनर्बांधणी कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर केली जाईल. या कामाची निविदा येत्या काही दिवसांत अंतिम केली जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर कार्यादेश देऊन तीन महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

डोंबिवलीकरांना दिलासा
१९९५ मध्ये पायाभरणी झाल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी पूर्ण झालेले हे नाट्यगृह डोंबिवलीतील नाट्यप्रेमींच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे नाट्यगृह बंद असल्याने नाट्यप्रेमींचा हिरमोड झाला होता, मात्र आता शासनाचा निधी प्राप्त झाल्याने आणि पालिकेने नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याने, डोंबिवलीकरांना लवकरच अत्याधुनिक आणि आकर्षक ‘कालिदास’च्या धर्तीवरचे रंगमंदिर उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: 352 वर्षांपूर्वी रायगड कसा होता? पहिल्यांदा जगासमोर 3D मॅपिंग! शिवरायांचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की पाहा

नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार; रूममध्ये नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध...

CM Yogi Adityanath: यूपी होमगार्ड स्थापना दिवस: सीएम योगींकडून जवानांचे कौतुक; भत्त्यांत वाढ आणि आरोग्य योजनेचे आश्वासन

Pune Special Trains: विमान प्रवाशांच्या मदतीला रेल्वे; बंगळूर दिल्लीसाठी विशेष गाड्या, गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न

कलमुरुडेश्वर मठाजवळ काँग्रेस ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; आरोपी बजरंग दलाशी संबंधित, दोन गटांत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT