मुंबई

गटारावरील रस्ताच उखडून गेला

CD

हेंद्रेपाडा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
भुयारी गटार कामांची दुरवस्था; बदलापूरमध्ये रस्त्यावर मोठा खड्डा

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : शहरात नुकतेच उच्च न्यायालयाने उल्हास नदी प्रदूषणावरून पालिका प्रशासनाला फटकारले असतानाच, आता शहरात यापूर्वी झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांची दुरवस्था समोर आली आहे. हेंद्रेपाडा परिसरात रस्त्याच्या खालून गेलेला भुयारी गटार योजनेचा पाइप तुटल्याने रस्ता उखडून मोठा खड्डा पडला आहे. यामुळे हा रस्ता रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.

बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा परिसरातील ‘आर्ष अव्हेन्यू’ सोसायटीकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या रस्त्याच्या मधोमध भुयारी गटाराचा मोठा पाइप जमिनीखालून गेला आहे. या पट्ट्यात बसवलेले पेव्हर ब्लॉक तुटून गेले आहेत. त्याखालील भुयारी गटारासाठी टाकलेला मोठा पाइपही तुटला आहे. रस्त्यातील मधला भाग पूर्णपणे उखडला असून, आतल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. आर्ष अव्हेन्यूसारख्या शेकडो रहिवासी संकुल असलेल्या सोसायटीत जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. रस्त्याची अवस्था पाहता वाहनचालक आता हा रस्ता टाळून पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत.

पालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह
शहरातील सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने, उच्च न्यायालयाने पालिकेला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर पालिका गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र यापूर्वी जेथे कामे पूर्ण झाली आहेत, तेथील पाइपलाइनची डागडुजी आणि दुरुस्ती होत नसल्याने भुयारी गटार योजनेच्या कामाच्या दर्जावर आणि देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डागडुजी करण्याचे आश्वासन
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी या रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीसाठी योग्य उपाययोजना करून रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले. परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याची व गटाराची डागडुजी करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Railway Ticket: एआय तिकिटांचा सुळसुळाट! विशेष स्क्वॉड तैनात, बनावट तिकीट आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास अन्...; रेल्वेची मोठी मोहीम

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

झी मराठीवर येतेय नवी मालिका 'शुभ श्रावणी'; दोन बड्या कलाकारांचं कमबॅक; पण आताही ओरिजनल नाहीच, प्रोमो पाहिलात?

Crime: सून सतत मोबाईवर व्यस्त; सासरे अन् दिराने फोन हिसकावला, संतापून महिलेचं धक्कादायक कृत्य, काय घडलं?

खांद्यावर पदर, सिंपल लूक अन् गुलाबी ग्लो, महाराष्ट्राची वहिनी जेनिलियाचा लूक पाहिला का? रितेशसोबतचा हटके Viral Video

SCROLL FOR NEXT