मुंबई

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा"

CD

भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा ‘प्रोजेक्ट महादेवा’
१३ वर्षांखालील मुला-मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट महादेवा ही योजना महाराष्ट्रातील १३ वर्षांखालील मुला‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. अंतिम टप्प्यात ६० मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राउंड, खारघर येथे आणि ६० मुलींची निवड डब्ल्यूआयएफए कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी प्रत्येकी ३० मुला‑मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल, यामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळेल.

नोंदणी आवश्यक
ही योजना मित्रा, क्रीडा विभाग, डब्ल्यूआयएफए, सिडको आणि व्हीएसटीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून, राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी शनिवारी (ता. १) मुले व रविवारी (ता. २) मुली यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदान, सेक्टर-१९, नेरूळ येथील क्रीडांगणात आयोजित करण्यात येणार आहे. या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरिता https://forms.gle/ctCMRZ४FZDxwYEvA७ या गुगल लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना ः
- सर्व खेळाडूंनी चाचणीस्थळी येण्यापूर्वी गुगल नोंदणी लिंकद्वारे नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- या निवड चाचणीमध्ये १ जानेवारी २०१२ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आणि ३१ डिसेंबर २०१३ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतील.
- सर्व खेळाडूंनी त्यांचे मूळ आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हास्तर निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या २० खेळाडूंची निवड ही विभागस्तरीय निवड चाचणीसाठी करण्यात येईल.
हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून, राज्यातील फुटबॉल खेळाला नवी दिशा देणारा आहे. तरी ‘महादेवा’ या महत्त्वाकांक्षी योजनेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Railway Ticket: एआय तिकिटांचा सुळसुळाट! विशेष स्क्वॉड तैनात, बनावट तिकीट आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास अन्...; रेल्वेची मोठी मोहीम

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

झी मराठीवर येतेय नवी मालिका 'शुभ श्रावणी'; दोन बड्या कलाकारांचं कमबॅक; पण आताही ओरिजनल नाहीच, प्रोमो पाहिलात?

Crime: सून सतत मोबाईवर व्यस्त; सासरे अन् दिराने फोन हिसकावला, संतापून महिलेचं धक्कादायक कृत्य, काय घडलं?

खांद्यावर पदर, सिंपल लूक अन् गुलाबी ग्लो, महाराष्ट्राची वहिनी जेनिलियाचा लूक पाहिला का? रितेशसोबतचा हटके Viral Video

SCROLL FOR NEXT