मुंबई

परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत

CD

परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळित
कोकण विभागाला ३० ऑक्‍टोबरपर्यंत यलो अलर्ट
अलिबाग, ता. २६ : परतीच्‍या पावसाने जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळित झाले आहे. रायगड जिल्‍हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पावसाच्‍या धसक्‍याने रायगडमधील शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत. शेतकऱ्यांची कापलेले भातपीक वाचवण्याची धडपड सुरू असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्‍याने कोकणासह राज्‍याच्‍या काही भागांत पावसाचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तवला आहे. रायगडसह संपूर्ण कोकणात ३० ऑक्‍टोबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्‍यात आला आहे. रायगड जिल्‍ह्याच्‍या सर्वच भागात अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. शनिवारी संध्‍याकाळपासूनच आकाशात काळेकुट्ट ढग जमायला सुरुवात झाली होती. रविवारी दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. दिवाळीनंतर परतीच्या प्रवासात असणारे चाकरमानी, पर्यटक मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडीत अडकले आहेत. माणगाव, कोलाड, नागोठणे येथे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या, तर मांडवा-रेवस जलवाहतूक विस्कळित झाली. भातकापणीची लगबग करणाऱ्या शेतकऱ्यांना दुपारपासून घरातच बसून वेळ काढावा लागला. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढतच गेल्याने पाण्याने शेती तुडुंब भरली आहे. या तुडुंब भरलेल्या शेतात कापलेला भात तरंगत आहे. अलिबाग, मुरूड, माणगाव तालुक्यात हे विदारक दृश्य दिसत होते.

पालघरमध्ये परतीच्या पावसाने भातपीक भुईसपाट
पालघर, ता. २६ : पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले; मात्र पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे कापणी करून ठेवलेले कोरडेठाक भात पूर्णतः भिजले. शेत खळ्यात कापून ठेवलेले भातपीक पाण्यात बुडाले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. कापून ठेवलेल्या भाताच्या लोबांना अंकुर फुटण्याची स्थिती निर्माण होणार असल्याने जिल्ह्यात शेतकरी चिंतेत आहेत. तलासरी आणि डहाणू तालुक्यांमध्ये १५० मिलिमीटरच्या जवळपास पाऊस पडल्याचा अंदाज कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान विभागाने वर्तवला आहे, तर विक्रमगड आणि मोखाड्यामध्ये १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. या चार तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

नवी मुंबई परतीच्या पावसाने दाणादाण
वाशी, ता. २६ (बातमीदार) :
ऑक्टोबर महिना संपत असून, परतीचा पाऊस सुरूच आहे, तर हवामान खात्याकडूनदेखील ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार नवी मुंबईत रविवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला. दिवाळी आधी पालिकेने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता, पण सुरू असणाऱ्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुसळधार पावसामुळे दिवसाढवळ्या वाहनचालकांना गाडीचे हेडलाइट्स चालू ठेवून वाहन चालवावे लागत आहे. नवी मुंबईत सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत सरासरी १३.१ मिमी पाऊस पडला आहे, तर बेलापूर १८.६ मिमी, नेरूळ ११.६ मिमी, वाशी ११.२ मिमी, कोपरखैरणे १२.२ मिमी, ऐरोली ११.६ तर दिघामध्ये १३.४ मिमी पाऊस पडला आहे, तर सीबीडी बेलापूर येथे एका ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडल्याची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

SCROLL FOR NEXT