मुंबई

कुणबी संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी देवीदास पाटील

CD

वज्रेश्वरी, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ठाणे जिल्हा सरचिटणीस देवीदास पाटील यांची कुणबी समाज सेवा संस्था ठाणे-पालघर जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
२०१४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची आजीवन सभासदसंख्या ८०० आहे. समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात योगदान देणारी ही संस्था वधू-वर मेळावे, अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा, अनिष्ट रूढी-परंपरांच्या विरोधात जनजागृती या माध्यमातून कार्यरत आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत संस्थेचे कार्य सातत्याने चालू आहे. पाटील यांनी २०१७ ते २०२२ आणि २०२२ ते २०२५ या दोन कार्यकाळात संस्थेचे खजिनदार व उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि सक्रिय सामाजिक सहभागामुळे त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. भिवंडी तालुक्यातील दुगाड हे त्यांचे मूळ गाव आहे. भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांनी सलग १५ वर्षे संचालक, उपसभापती आणि सभापती म्हणून कार्य केले आहे. दुगाड ग्रुप सेवा सहकारी सोसायटीचे १८ वर्षे संचालकपद त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ संस्थेच्या कार्याला मिळेल, असा विश्वास माजी अध्यक्ष चंद्रकांत लाटे यांनी व्यक्त केला.

नवीन पदाधिकारी जाहीर
निवड प्रक्रियेत उपाध्यक्ष म्हणून शुभाष पाटील आणि विकास जाधव, खजिनदार म्हणून प्रभाकर साबळे, तर सचिव पदावर शामराव कोरडे यांची निवड झाली. ज्येष्ठ संचालक दत्तात्रेय पठारे, काशिनाथ तारमळे, देवानंद पाटील, राजाराम भोईर, शोभना जाधव, अरुणा सांबरे आणि विद्या पाटील यांनी देवीदास पाटील आणि नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Railway Ticket: एआय तिकिटांचा सुळसुळाट! विशेष स्क्वॉड तैनात, बनावट तिकीट आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास अन्...; रेल्वेची मोठी मोहीम

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

झी मराठीवर येतेय नवी मालिका 'शुभ श्रावणी'; दोन बड्या कलाकारांचं कमबॅक; पण आताही ओरिजनल नाहीच, प्रोमो पाहिलात?

Crime: सून सतत मोबाईवर व्यस्त; सासरे अन् दिराने फोन हिसकावला, संतापून महिलेचं धक्कादायक कृत्य, काय घडलं?

खांद्यावर पदर, सिंपल लूक अन् गुलाबी ग्लो, महाराष्ट्राची वहिनी जेनिलियाचा लूक पाहिला का? रितेशसोबतचा हटके Viral Video

SCROLL FOR NEXT