मुंबई

राजकीय पक्षांचे प्रभाग आरक्षणाकडे लक्ष

CD

राजकीय पक्षांचे प्रभाग आरक्षणाकडे लक्ष
इच्छुकांमध्ये धाकधूक; १५ नोव्हेंबरपर्यंत सोडतीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः दिवाळी आटोपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. विविध पक्षांच्या सभा आणि बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे; मात्र या धामधुमीत इच्छुकांचे डोळे लागले आहेत ते प्रभागांच्या आरक्षणाकडे. आपल्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार, प्रभाग कसा आरक्षित होणार, याची धाकधूक इच्छुकांना लागली आहे.
मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत काढण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेस दिवाळीपूर्वी निवडणूक आयोगाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सध्या विधानसभानिहाय तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या निवडणूक आयोगाला दिल्या जाणार आहेत. त्या मतदार याद्यांचे प्रभाग रचनेनुसार विभाजन होणार आहे. त्यानंतर या मतदार याद्या नगरविकास विभाग आणि नंतर राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहेत. त्या मतदार याद्यांना मंजूरी मिळाल्यानंतर प्रभाग आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
---
इच्छुक पर्यायाच्या शोधात
इच्छुकांमध्ये आरक्षण सोडतीवरून कमालीची अस्वस्थता आहे. आरक्षण कसे पडेल, मेहनत करून बांधलेल्या प्रभागात कसे आणि कोणते आरक्षण पडेल, प्रभाग आरक्षित झाला तर पर्याय काय?, पर्यायाच्या शोधात इच्छूक असल्याचे समजते. सर्वच पक्षातील माजी नगरसेवक त्यामुळे चिंतेत आहेत.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सप्तश्रृंगी गड घाटात कार दरीत कोसळली, ओव्हरटेकच्या नादात अपघात; ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

IND vs SA: 'एक DRS माझ्यासाठीच आहे...', रोहित शर्माने उडवलेल्या खिल्लीवर अखेर कुलदीप यादव बोलला; पाहा Video

Viral: वेळेआधी कामावर जायची; बॉसने कंपनीतून काढले, महिला कोर्टात पोहोचली अन्..., प्रकरण काय?

Education Department: शिक्षण विभागाचा दणका! तब्बल ९६,८०० शिक्षकांचे वेतन कापणार; नेमकं कारण काय?

Uncontrolled Diabetes Dangers: ‘मला काही होत नाही’ म्हणणाऱ्यांनो सावध! अनियंत्रित मधुमेह देतो अशा गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT