विरार, ता. २७ (बातमीदार) : उत्तन समुद्रकिनारी ४२ वर्षीय मच्छीमाराच्या हाताला वाम माशाने चावा घेतला होता. त्यामुळे गंभीर जखमा झाल्याने हात कापण्याची वेळ आली होती, मात्र मिरा रोड येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार करून त्यांचा हात वाचवला.
भाईंदरमधील उत्तन किनारी खडकाळ परिसरात गेली अनेक वर्षे संदीप भोईर (नाव बदललेले) मासेमारी करत आहेत. मासे हाताळताना त्याच्या हातातून ईल (वाम) मासा निसटला आणि त्याने त्यांच्या डाव्या मनगटावर दोन वेळा चावा घेतला, ज्यामुळे खोल जखमा आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. सहकारी मच्छीमारांनी तत्काळ घट्ट पट्टी बांधून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला व घरीच उपचार सुरू केले, परंतु त्यात यश आले नाही आणि जवळपास १७ तासांनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात पोहोचण्याच्या वेळी संदीप यांचा हात आणि बाहू प्रचंड सुजलेले, फिके पडलेले आणि पूर्णपणे रक्तप्रवाह व संवेदना नसलेले होते. ते बोट हलवू शकत नव्हते आणि किंचित हालचालीने तीव्र वेदना होत होत्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना ॲक्युट कम्पार्टमेंट सिंड्रोम असल्याचे निदान केले, ही अशी स्थिती असते, ज्यात सुजेमुळे स्नायू आणि नसांमधील रक्तप्रवाह थांबतो आणि हाताचा कायमचा अपघात होऊ शकतो. त्यांना तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले, जिथे डॉ. सुशील नेहेते यांनी आपत्कालीन शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेनंतर संदीप यांचा बरे होण्याचा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या हातातील रक्तप्रवाह लगेचच सुरू झाला आणि काही आठवड्यांत संवेदना व हालचाल बरीच सुधारली आहे. सध्या ते जखमेची काळजी, फिजिओथेरपी घेत आहेत आणि लवकरच त्वचा प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.