मुंबई

दर तीन महिन्यांनी कार्य अहवाल पाठवा!

CD

दर तीन महिन्यांनी कार्य अहवाल पाठवा!
कुलपती आचार्य देवव्रत यांच्या कुलगुरूंना सूचना
मुंबई, ता. २८ : महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे स्पर्धा वाढत असताना आपल्या विद्यापीठांचे गुणांकन घसरत आहे, ही चिंतेची बाब आहे. विद्यापीठांनी दर तीन महिन्यांनी कार्य अहवाल राजभवनला पाठवावा, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी कुलगुरूंना केली. अहवालात विद्यापीठांनी आपल्या अडचणी, समस्यादेखील मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले.
कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, की विद्यापीठ-महाविद्यालयांनी वसतिगृहे, भोजन कक्ष, स्वच्छतागृहे नीटनेटकी आहेत की नाही हे तपासले पाहिजे. वसतिगृहे ही व्यसनाची केंद्रे होऊ नयेत, याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. याकरिता विद्यापीठांनी व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करावे. विद्यापीठांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या कार्यात आपल्या विद्यार्थ्यांना तसेच रासेयो व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
--
नैतिक शिक्षणावर भर हवा
भारतीय ज्ञान प्रणाली लागू करून विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यापीठांनी शाळांना भेटी देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करावे. त्यामुळे उच्च शिक्षणातील युवकांचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान व पदवी देणे इतकेच कर्तव्य नसून, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्य ज्ञान द्यावे तसेच विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडवावे, अशी अपेक्षा कुलपतींनी व्यक्त केली.
--
कुलपतींनी दिलेल्या सूचना
- नवे शैक्षणिक धोरण पूर्ण प्रामाणिकपणे राबवा.
- विद्यापीठांनी आपले गुणांकन सुधारावे.
- विद्यार्थ्यांना खेळण्यास प्रेरित करावे.
- विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षण प्राधान्याने द्यावे.
- प्रशासन पारदर्शक व गतिमान करावे.
- वसतिगृह, मेस, स्वच्छतागृहे येथे अधूनमधून पाहणी करावी.
- विद्यापीठांनी स्कूल कनेक्ट कार्यक्रम नेटाने राबवावा.
- भारतीय ज्ञान प्रणाली लागू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

SCROLL FOR NEXT