मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

पेण फेस्टिव्हलचे भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पेण वार्ताहर : स्वररंग आयोजित १७ व्या पेण फेस्टिव्हलचे उद्घाटन भाजप रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. पेण नगरपालिका मैदानावर दरवर्षी आयोजित होणारा हा फेस्टिव्हल रायगडकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरतो. नृत्य, फॅशन शो, मिस्टर व मिसेस रायगड, शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच खाद्य स्टॉल्समुळे फेस्टिव्हलला उत्साही प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन प्रसंगी शिवशाहीर वैभव घरत यांच्या पोवाड्यासह लहान मुलांच्या नृत्य कार्यक्रमांचा आनंद उपस्थितांनी घेतला.

२. शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्काराने महेश पाटील सन्मानित
पेण वार्ताहर : रायगड जिल्हा परिषदेच्या ‘शिवभूमी आदर्श शिक्षक’ पुरस्काराने बोरगाव शाळेचे उपशिक्षक महेश पाटील यांना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांची सेवा देणाऱ्या पाटील यांनी ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत शाळा परिसराचे सौंदर्य वाढवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

३. एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी एकरकमी देण्याची मागणी
पेण : राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकीची एकरकमी रक्कम देण्याची मागणी केली. पेण येथे झालेल्या बैठकीत विचारे, श्रीराम गालेवाड, प्रभाकर आंबेकर, जी.एम. पाटील आदी उपस्थित होते. शासनाने कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ फरकाची तरतूद केली असताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

४. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कोलाड येथे ‘एकता दौड’
रोहा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोलाड येथे ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, पोलिस अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलिस अधिकारी नितीन मोहिते यांनी राष्ट्रीय एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. एक भारत, श्रेष्ठ भारत, घोषणांनी परिसर दुमदुमला.

५. गोरेगावात ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीवर्धन : सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करत गोरेगाव पोलिस ठाण्याने रन फॉर युनिटी आयोजित केली. सुमारे १७५ सहभागी पोलिस कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी दौडमध्ये सहभाग घेतला. उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेत एक भारत, श्रेष्ठ भारतचा नारा दिला. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

६. भाल विठ्ठलवाडीत कार्तिक एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पेण बातमीदार : कार्तिक एकादशीनिमित्त भाल विठ्ठलवाडीत पारंपरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते २ नोव्हेंबरदरम्यान पहाटे काकडा, हरिपाठ व भजन-कीर्तन कार्यक्रम होणार आहेत. ह.भ.प. स्नेहल पित्रे यांचे हरदासी कीर्तन, दिंडी सोहळा व हरिपाठ मंडळाचा सहभाग यामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

७. बतावणीच्या बहाण्याने महिलेला फसविणारा आरोपी अटक
तळा : बतावणी करून घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेला फसविणाऱ्या आरोपीला तळा पोलिसांनी अटक केली. उर्मिला नाडकर या फिर्यादीच्या तक्रारीवरून तळा पोलिसांनी तपास करून आरोपीला गोरेगाव येथून पकडले. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

८. कर्जतच्या महावीर पेठेत शौचालयाच्या कमतरतेने नागरिक त्रस्त
कर्जत : महावीर पेठ परिसरात शौचालयांची सुविधा अपुरी असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी बसवलेले स्वयंचलित शौचालय बंद पडले असून तात्पुरती सोयही निष्क्रिय झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) उपशहरप्रमुख रोहित ओसवाल यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन देऊन तातडीने नवीन शौचालय उभारण्याची मागणी केली. चव्हाण यांनी एका महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Ganesh Kale Murder: गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू–कृष्णावर गुन्हा दाखल, आंदेकर गँगचा डाव उघड! पोलिसांनी दिली माहिती

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

Latest Marathi News Update : मुसळधार पावसाचा मिरची पिकावर गंभीर परिणाम, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT