वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या यादीची कटऑफ जाहीर
मुंबई, ता. १ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष एमबीबीएस व बीडीएसच्या एकूण १,७६४ रिक्त जागांसाठी वैद्यकीय प्रवेशाची तिसऱ्या यादीची कटऑफ शनिवारी (ता. १) जाहीर झाली असून यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. या कटऑफमध्ये खुल्या प्रवर्गातील एमबीबीएसच्या शासकीय महाविद्यालयांमधील प्रवेशाची कटऑफ ६१५ गुणांवर तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील कटऑफ ५४५ गुणांवर येऊन ठेपली आहे. तर बीडीएसची शासकीय महाविद्यालयांमध्ये ५०२ आणि खासगी महाविद्यालयांमध्ये ४७६ गुणांवर ही कटऑफ पोहोचली आहे.
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील एमबीबीएसच्या कटऑफमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांना शासकीयमध्ये ६०० आणि खासगीत ४६० गुणांवर येऊन थांबली आहे. बीडीएससाठीही ही कटऑफ शासकीयमध्ये ४२३ आणि खासगी महाविद्यालयांमध्ये ३९९ पर्यंत येऊन पोहोचली आहे. एमबीबीएस आणि बीडीएसची सर्वात कमी कटऑफ ही एनटीबी प्रवर्गासाठी असून त्या खालोखाल अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असल्याचेही दिसून आले आहे. तिसऱ्या प्रवेशाच्या फेरीसाठी राज्यात एमबीबीएसच्या ७८९ व बीडीएसच्या ९७५ मिळून १,७६४ रिक्त जागा आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएससाठी १६८ तर बीडीएससाठी ६० जागा रिक्त आहेत. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएससाठी ६२१ तर बीडीएससाठी ९१५ जागा रिक्त आहेत. अशा एकूण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी १,७६४ जागा राज्यात रिक्त आहेत. यासाठी शनिवारपासून प्रवेशाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे.
तिसऱ्या फेरीच्या प्रवेशाचे वेळापत्रक
तिसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, या तिसऱ्या गुणवत्ता यादीतून सीईटी सेलने चार दिवसांपूर्वीच चुकीची कागदपत्रे अपलोड करणाऱ्या २२० विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.