मुंबई

शुक्रवारी मुंबईत पाणीबाणी

CD

शुक्रवारी मुंबईत पाणीबाणी
तानसा जलवाहिनीच्या कामामुळे कपात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : तानसा तसेच विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. यासाठी शुक्रवारी (ता. १४) सकाळी १० वाजेपासून ते शनिवारी (ता. १५) सकाळी ८ वाजेपर्यंत पूर्व उपनगराचा पुरवठा बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या एनएलएम पश्चिम आणि एफ उत्तर प्रशासकीय विभागांतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तानसा आणि विहार जलवाहिन्यांवरील झ़डपा बदलण्याचे काम या काळात केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा तसेच पाणी कपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन केले आहे.
..................
कुर्ला ः एल विभाग
न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाईवाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर.
चेंबूर ः एम पश्चिम विभाग
टिळक नगर, टिळक नगर स्थानक रस्ता, पेस्टम सागर रस्ता (क्रमांक १ ते ६), ठक्कर बाप्पा वसाहत (पाडा १ ते ४), शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस. जी. बर्वे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, प्रगती सोसायटी, गोदरेज वसाहत, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत, एमएमआरडीए एसआरए वसाहत.
माटुंगा - एफ उत्तर विभाग
शीव (सायन) पश्चिम व पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाउंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा बिल्डिंग्ज (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा–सरदार नगर, संजय नगरचा काही भाग, गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा भीमवाडी (प्रवेशद्वार क्र. ४ व ५).
घाटकोपर ः एन विभाग
राजावाडी (पूर्व), चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओएनजीसी वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर. एन. गांधी मार्ग.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government on Delhi Bomb Blast : दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी सरकार कडक भूमिकेत ; ‘Act of War’ मानत भयानक दहशतवाद हल्ला ठरवलं!

E-Bus : एक हजार ई-बस घेण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर

Meta AI Speech Model : ‘मेटा’नं लाँच केलं नवीन ‘AI स्पीच मॉडेल’; भारतीयांसाठीही आहे Good News!

cctv footage: मृत्यू दिसला! बराच वेळ वरती बघितलं अन् कोसळले; मंदिरामध्ये वृद्धाचा मृत्यू, Video Viral

Pune Municipal Election : महापालिकेचे आरक्षण पडल्यानंतर राजकीय खलबतांना जोर

SCROLL FOR NEXT