मुंबई

बदलापुरात निष्ठेचा अपमान, नात्यांचा सन्मान

CD

बदलापुरात निष्ठेचा अपमान, नात्यांचा सन्मान
एकाच घरातील सहा उमेदवार रिंगणात; शिंदे गटात नाराजी

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : शिवसेना शिंदे गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यादीत पक्षनिष्ठेपेक्षा घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचा आरोप होत असून, अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे संघटना खिळखिळी झाली असून, काही पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप आणि राष्ट्रवादीची वाट धरल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शहरातील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना थेट उमेदवारी देण्यात आली आहे. यात भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय व माजी नगराध्यक्षा उषा म्हात्रे, पुतण्या भावेश म्हात्रे, मुलगा वरुण यांच्यासह त्यांच्या पत्नी वीणा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरप्रमुखांच्या मर्जीत राहणाऱ्यांनाच संधी मिळते, अशी टीका पक्षांतर्गत सुरू आहे. त्याचबरोबर गटनेते श्रीधर पाटील आणि त्यांच्या पत्नी स्वप्ना पाटील, शहरप्रमुखांचे निकटवर्तीय संदेश ढमढेरे आणि त्यांची बहीण सोनिया ढमढेरे यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक प्रकाश पाटील व नीलिमा पाटील यांच्या कुटुंबातील रोहन पाटील, प्रथमेश पाटील व वैशाली पाटील या नव्या चेहऱ्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्या कुटुंबातील त्यांच्या वहिनी माजी नगराध्यक्ष विजया राऊत आणि पत्नी शीतल राऊत यांना उमेदवारी दिल्याने शहरातील घराणेशाहीचा मुद्दा अधिक ठळक बनला आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांचे ‘जय महाराष्ट्र’
पक्षवाढीसाठी दशकभर काम करणारे महेश जाधव आणि तुषार साटपे, उत्तर भारतीय शहरप्रमुख सुरेंद्र यादव यांनी नाराजीने सेनेला रामराम ठोकला आहे. तसेच यात महेश जाधव व उत्तर भारतीय नेते सुरेंद्र यादव यांनी आपल्या हजारो उत्तर भारतीय सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. तर तुषार साटपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला, तर सेनेचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी सेनेतून आधी राष्ट्रवादी व त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात सेनेच्या विरोधातील ताकद अधिक वाढली आहे.

गोळीबार प्रकरणातील सूत्रधाराच्या पत्नीला उमेदवारी
उमेदवारी यादीत जगदीश कुडेकर यांच्या पत्नी सपना कुडेकर यांना संधी देण्यात आली आहे. जगदीश कुडेकर हे काही महिन्यांपूर्वी आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात हल्ला झालेल्या तरुणाने जगदीश कुडेकर हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्याने शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत.

२०२०मध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेची निवडणूक होणार होती. त्या वेळी माझी मुलगी आरती यादव हिला उमेदवारी देण्याचे मान्य केले. त्या अनुषंगाने आम्ही पक्षाचे जोरदार काम केले. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले; मात्र अचानक कोरोनामुळे ही निवडणूक रद्द झाली आणि पाच वर्षे ही निवडणूक रखडली. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतरसुद्धा आम्हाला उमेदवारी मिळणार, अशी आशा दाखवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र संभाव्य उमेदवार यादी प्रसिद्ध करताना आम्हाला डावलल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
- सुरेंद्र यादव, शिवसैनिक

गेली अनेक वर्षे मी पक्षाचे काम करीत होतो. अगदी शहरप्रमुखांचा निकटवर्तीय म्हणून मी काम केले आहे. बहुजनांची मते सेनेकडे वळवण्यासाठी मी प्रभागात आणि शहरात सगळ्या नागरिकांना भेटून पक्षवाढीचे काम केले आहे. मला २०२०मध्ये रखडलेल्या निवडणुकीपासून उमेदवारी देण्याचे मान्य केले होते. या वेळी होणाऱ्या निवडणुकीत मला ती उमेदवारी मिळेल, असा शब्द होता; मात्र तो शहरप्रमुख आणि पक्षाने पाळला नाही. घराणेशाहीला या वेळी महत्त्व देण्यात आले.
- तुषार साटपे, शिवसैनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government on Delhi Bomb Blast : दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी सरकार कडक भूमिकेत ; ‘Act of War’ मानत भयानक दहशतवाद हल्ला ठरवलं!

E-Bus : एक हजार ई-बस घेण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर

Meta AI Speech Model : ‘मेटा’नं लाँच केलं नवीन ‘AI स्पीच मॉडेल’; भारतीयांसाठीही आहे Good News!

cctv footage: मृत्यू दिसला! बराच वेळ वरती बघितलं अन् कोसळले; मंदिरामध्ये वृद्धाचा मृत्यू, Video Viral

Pune Municipal Election : महापालिकेचे आरक्षण पडल्यानंतर राजकीय खलबतांना जोर

SCROLL FOR NEXT