मुंबई

त्रिभाषा समितीच्या भेटीपूर्वी शिक्षण विभागाच्या बैठकांचा जोर

CD

त्रिभाषा समितीच्या भेटीपूर्वी बैठका
अधिक जणांना सहभागी करण्याचे आदेश

मुंबई, ता. २५ : पहिलीपासून त्रिभाषा धोरणाच्या सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीकडून मुंबईत शुक्रवारी (ता. २८) भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा मुंबईतील भेटीचा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयासह मुंबईतील महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचा जोर वाढला आहे.
डॉ. समितीसाठी मुंबई विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) आदी अधिकाऱ्यांची टीम कामाला लावण्यात आली आहे. यासोबतच सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका व नगरपालिका शिक्षण मंडळांचे प्रशासनाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक तज्‍ज्ञ व्यक्तींना जिल्हास्तरीय चर्चासत्रासाठी घेऊन येण्याचे आदेशच जारी करण्यात आले असून, त्यासाठीच्या एकूण तयारीचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. तसेच यात त्रिभाषा धोरण आणि शालेय शिक्षण विभागाने घेतलेली भूमिका तसेच त्यासाठीचे महत्त्व या बैठकीमध्ये समजावून सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत भेटी
मुंबईत भेटीदरम्यान जाधव समिती सामान्य नागरिक, भाषातज्‍ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते आदींबरोबर संवाद साधणार आहेत. त्यांची मते जाणून घेण्यासाठी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असेल. याच कालावधीत दुपारी ३ ते ५ वाजता ऑनलाइन व्हीसीद्वारे ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील नागरिकांसोबत संवाद साधला जाणार आहे.
...
मुंबईसाठी ३०० नागरिकांचे टार्गेट
डॉ. जाधव समितीकडून मुंबईतील दिवसभराच्या भेटीदरम्यान विविध क्षेत्रांतील तब्बल ३०० नागरिक, तज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षक, पालक आदींना जमविण्याचे टार्गेट शिक्षण ‍विभागाला देण्यात आले आहे. यासाठी मुंबईतील शिक्षण संस्थांसह शिक्षक संघटनांवर अधिक जोर देण्यात आला असून, त्यांना विभागाकडून खास निमंत्रण देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT