मुंबई

जिजामाता नगर झोपु प्रकल्प विधीमंडळात प्रश्न मांडणार प्रवीण दरेकर यांचे आश्वासन

CD

जिजामाता नगर झोपु प्रकल्पाबाबत विधिमंडळात प्रश्न मांडणार
प्रवीण दरेकर यांचे आश्वासन

मुंबई, ता. ६ : गेली तीस वर्षे विकसकामुळे रखडलेल्या काळाचौकी जिजामातानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू, असे आश्वासन आज (ता. ६) महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे (कॅबिनेट मंत्री दर्जा) अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी भेट दिली.
हा प्रकल्प रखडवणाऱ्या विकसकाची नियुक्ती रद्द करून हा प्रकल्प शासनाने ताब्यात घेऊन पूर्ण करावा, यासाठी युवा संघर्ष संघटनेच्या किरण निकम आणि नीलेश गुरव यांसह स्थानिक महिला रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी आज प्रवीण दरेकर यांनी भेट देऊन रहिवाशांना वरीलप्रमाणे आश्वासन देताना जिजामातानगरवासीयांना न्याय देईन, असेही ठामपणे सांगितले. रहिवाशांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही दरेकर यांनी केली. दरेकर यांच्या विनंतीला मान देऊन युवा संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी स्थानिक आमदार अजय चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष शलाका साळवी, नितीन बनकर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Gautam Gambhir: 'लोकांनी आमच्या क्षेत्रात नाक खुपसू नये, आम्ही...', वनडे मालिका जिंकल्यानंतर IPL मालकावर भडकला गंभीर

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT