मुंबई

मालवणीत भाजप काँग्रेस चे उदघाटन नाट्य

CD

भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवादावरून ''उद्घाटन नाट्य''
तब्बल १४ वर्षांनी केईएम उपरुग्णालयाचे उद्घाटन
मालाड, ता. ७ (बातमीदार) : मालाड मालवणी गेट क्रमांक ७ येथील केईएम रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावरून शनिवारी (ता. ६) भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. तब्बल १४ वर्षे रखडलेल्या या उपरुग्णालयाच्या उद्घाटनासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दोन दिवसांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांसह या इमारतीची पाहणी केली होती. त्यानंतर भाजप नेते तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा शनिवारी उद्घाटन करणार असल्याचे समजताच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रुग्णालयाजवळ जमा झाले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन सुरू झाले. परिस्थिती चिघळत असताना, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे तणाव कमी झाला.
स्थानिक नेतेमंडळींनी आपापसात समझोता करून प्रत्येकी दहा कार्यकर्ते उद्घाटनाच्या ठिकाणी जातील, असे ठरवले. मात्र, काही क्षणात इतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना ढकलण्याचा प्रयत्नही झाला. आमदार अस्लम शेख यांच्या आगमनानंतर दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. त्यानंतर काही वेळातच मंत्री मंगलप्रभात लोढा हेही पोहोचले आणि त्यांच्या हस्ते शांततेत इमारतीचे लोकार्पण पार पडले.
------------------------
राजकीय टोलेबाजी
आमदार अस्लम शेख यांनी, लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, पण प्रशासनाकडून विलंब होतो, असे सांगितले. बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना शोधून परत पाठवण्याची जबाबदारी सरकारची व प्रशासनाची आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले.
त्याला प्रतिउत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आम्ही ते करू आणि त्यांना परत मायदेशी पाठवू. आज महापरिनिर्वाण दिवस असल्याने आम्ही उद्घाटनाची घाई केली, तसेच केईएमच्या अधिष्ठात्यांना रुग्णालयाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
------------------------
१४ वर्षांचा विलंब
या रुग्णालयाचे बांधकाम तब्बल १४ वर्षे रखडले होते. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी हे रुग्णालय तयार होऊन त्याचे लोकार्पण होणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही. आता उद्घाटनासाठी दोन्ही पक्ष श्रेयवादासाठी आमनेसामने उभे ठाकले. त्यावेळी अपक्ष नगरसेवक सिरील डिसोझा यांनी खूप प्रयत्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० वर्षात २४ बदल्या, कुठेच टीकत नाही; तुकाराम मुंढेंना बडतर्फ करण्याची भाजप आमदाराची मागणी, फडणवीसांनी दिलं उत्तर

Supreme Court : ''महिलेच्या स्तनाला हात लावणे बलात्काराचा प्रयत्न नाही'' म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर संतापले CJI सूर्य कांत; कोर्टरुमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील रमेश डाईंग दुकानाला लागलेली आग आटोक्यात, कुठलीही जीवितहानी नाही

IND vs SA 1st T20I : संजू सॅमसन, कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही जागा; पहिल्या ट्वेंटी-२० साठी निवडला भारतीय संघ

IPL 2026 Auction : राहतो ऑस्ट्रेलियात, लिलावात भारतीय खेळाडू म्हणून नाव नोंदवलंय... शुभमन गिल, अभिषेक, अर्शदीप यांच्याशी कनेक्शन; कोण आहे निखिल चौधरी?

SCROLL FOR NEXT