बेलपाडा डोंगराला वणव्याची झळ
खारघर, ता. ९ (बातमीदार) : सेक्टर पाच बेलपाडा डोंगरावर वणव्यामुळे गवत, वनसंपदा नष्ट झाली. अग्निशमन जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने आदिवासी पाड्यावरील अनर्थ टळला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
अग्निशमन जवान आग विझवून माघारी फिरले. सायंकाळच्या वेळी पुन्हा वणवा लागल्याचे माजी सरपंच संजय घरत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ अग्निशमन केंद्राला दिली. अग्निशमन जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. खारघरमध्ये डोंगरावर वणवा सुरू झाल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून माथेफिरूचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.